हृदयद्रावक घटना! नातवाने आजीला थेट कचराकुंडीत फेकलं, धक्कादायक कारण आलं समोर

On: June 23, 2025 11:18 AM
Crime News
---Advertisement---

Crime News | मुंबईतील आरे कॉलनी परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ८० वर्षांच्या वृद्ध महिलेला तिच्याच नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. (Grandmother Dumped by Grandson)

यशोदा गायकवाड असं या वृद्ध महिलेचं नाव आहे. त्या त्वचेच्या कॅन्सरने त्रस्त आहेत. उपचारासाठी आर्थिक अडचणी असल्यामुळे त्यांच्या नातवाने त्यांना घराबाहेर काढून थेट कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून दिलं. ही घटना उघडकीस आल्यानंतर मुंबईकरांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

दोन रुग्णालयांनी उपचारास नकार; पोलिसांनी घेतली पुढाकार :

पोलिसांनी माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यशोदा गायकवाड यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, दोन खासगी रुग्णालयांनी उपचार करण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी पुढाकार घेत कूपर रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

या महिलेची चौकशी केली असता त्यांनी मालाड येथील आपल्या राहत्या घराचा पत्ता सांगितला. पोलीस तिथे पोहोचले असता त्या घराला कुलूप लावलेलं होतं. सध्या पोलीस त्या नातवाचा आणि संबंधित कुटुंबाचा शोध घेत आहेत. (Grandmother Dumped by Grandson)

Crime News | नातवाने केला विश्वासघात? चौकशी सुरू :

या घटनेनं नातवाने आपल्या आजीबद्दल दाखवलेली अमानुषता उघड झाली आहे. आजीला दुर्धर आजार झाल्यानंतर, तिची काळजी घेण्याऐवजी तिला टाकून देणं हे फक्त नात्यांचा अपमान नाही, तर संपूर्ण समाजासाठी लाजिरवाणी बाब आहे.

पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन देण्यात आलं आहे. दरम्यान, या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, नात्यांमधील नाजूक विश्वासाला तडा गेल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करत अशा प्रकारांवर कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. “माणुसकी इतकी गहाण पडलेली कधीच पाहिली नव्हती,” अशा भावना व्यक्त होत आहेत.

News Title: Shocking in Mumbai: Grandson Abandons Cancer-Stricken Grandmother in Garbage Due to Lack of Funds

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now