मनीषाचा तो मेल पोलिसांच्या ताब्यात, डॉ. वळसंगकर प्रकरणात धक्कादायक वळण!

On: June 18, 2025 12:16 PM
Dr. Shirish Valsangkar Death Case
---Advertisement---

Dr. Shirish Valsangkar | सोलापूरमधील सुप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांच्या मृत्यू प्रकरणी आता एक मोठा खुलासा झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी डॉ. वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणात आता पोलिसांच्या हाती संशयित आरोपी मनिषा माने मुसळे हिचा धक्कादायक ई-मेल लागला असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.

सोलापूर शहर पोलिसांनी या प्रकरणात 720 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. पोलिसांच्या तपासानुसार, मनिषाने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे स्पष्ट झाले असून, तीच यामागची प्रमुख सूत्रधार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

ई-मेल, धमक्या आणि मनस्तापाचे पुरावे पोलिसांच्या ताब्यात :

१७ एप्रिल रोजी मनिषा मानेने डॉ. शिरीष यांना दोन पानी ई-मेल पाठवला, जो त्यांच्या पत्नी डॉ. उमा, मुलगा डॉ. अश्विन आणि सून डॉ. शोनाली यांनाही पाठवण्यात आला होता. त्याच दिवशी मनिषाने ५६ मिनिटे केबिनमध्ये थांबून डॉ. शिरीष यांच्याशी चर्चा केल्याचे सीसीटीव्ही फूटेजद्वारे स्पष्ट झाले आहे.

अगदी दुसऱ्याच दिवशी, १८ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा ते सव्वासात या वेळेत डॉ. शिरीष यांनी आपल्या मुलाशी बोलून मनिषामुळे होणाऱ्या मानसिक त्रासाची माहिती दिली होती. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, “मनिषामुळे होणारा त्रास मी सहन करू शकत नाही, म्हणूनच जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे.” (Dr. Shirish Valsangkar)

Dr. Shirish Valsangkar | अधिकार काढून घेतल्याने मनिषाची चिडचिड :

डिसेंबर २०२४ पासून डॉ. वळसंगकर यांनी मनिषाचे रुग्णालयातील अधिकार कमी केले होते. यामुळे संतप्त झालेल्या मनिषाने सतत धमक्या द्यायला सुरुवात केली. रुग्णालयाच्या समोर जाळून घेण्याची आणि डॉ. वळसंगकर यांच्या मुलांना मारण्याची धमकी देत ती त्यांच्यावर मानसिक दबाव टाकत होती.

पोलिसांनी दोषारोपपत्रात नमूद केले आहे की, मनिषाने (Manisha) केवळ धमक्याच दिल्या नाहीत, तर बदनामी करण्यासाठी सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावर प्रयत्न केले. या सर्व पुराव्यांचा समावेश पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या दस्तऐवजांमध्ये केला आहे.

न्यायप्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष; जामीन अर्जावर आज सुनावणी :

या प्रकरणात एकूण ५८ दिवस तपास झाला असून, ७३ साक्षीदारांची जबाबे नोंदवण्यात आली आहेत. एकूण १९ वस्तू आणि १०८ कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. आता या प्रकरणातील मुख्य आरोपी मनिषाच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. (Dr. Shirish Valsangkar)

मनिषाचे वकील अ‍ॅड. प्रशांत नवगिरे (Adv. Prashant Navgire) हे आता दोषारोपपत्राचा सखोल अभ्यास करून न्यायालयात तिची बाजू मांडणार आहेत. त्यामुळे पुढील सुनावणीकडे संपूर्ण सोलापूरच नव्हे, तर राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

News Title: Shocking Email Surfaces in Dr. Shirish Valsangkar death Case: Police File 720-Page Chargesheet

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now