ललित पाटीलबद्दल धक्कादायक खुलासा!

On: October 30, 2023 1:39 PM
---Advertisement---

पुणे | ललित पाटीलच्या (Lalit Patil) अटकेनंतर ड्रग्स संदर्भात नवनवे खुलासे बाहेर येत आहेत. ललित पाटीलसोबत ड्रग्स प्रकरणात 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ललित पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाला होता. त्यानंतर त्याला मुंबई पोलिसांनी बंगळूरु येथे बेड्या ठोकल्या.

ललित पाटील संदर्भात अणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. ललित ससून रुग्णालयात उपाचार घेत होता. त्याचा रुग्णालयातील मुक्काम वाढवण्यासाठी ललित पाटील याच्यासाठी ससूनचे डीन म्हणजे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनी वैद्यकीय अध्यक्षांना पत्र दिलं होतं.

ललित पाटील याला टीबी हा आजार झाल्याचं या पत्रात सांगण्यात आलं आहे. ललित पाटील याला टीबी आजारासह पाठदुखीचा देखील आजार असल्याचा उल्लेख पत्रात केला होता. आता हे पत्र समोर आल्यानंतर डॉ. संजीव ठाकूर यांच्यासमोर अडचण वाढणार आहे.

डाॅ. संजीव ठाकूर यांनी या सोबतच पाठदुखी आणि हर्नियाचा आजारही दाखवला आहे. त्याच्यावर मोठ्या शस्त्रक्रियेची गरज असल्याचं यात म्हटलं आहे. ललित पाटील याचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढवा यासाठी चक्क डीनकडून वैद्यकीय अधीक्षकांना पत्र दिलं गेलं होतं, अशी माहिती समोर आलीये.

थोडक्यात बातम्या-

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now