“आपण बिहारच्या मार्गाने चाललोय”; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्यानं नेतृत्वावर केला हल्ला

On: December 16, 2024 2:43 PM
Shivsena
---Advertisement---

Shivsena l महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल 15 डिसेंबरला पार पडला आहे. यावेळी मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. तसेच या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. परंतु, या मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये नाराजी नाट्य सुरु झाले आहे. अशातच आता शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी मंत्रीपद न मिळाल्याने प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे? :

शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे म्हणाले की, “माझ्यासाठी मंत्रिपद इतकं महत्त्वाचं नाही. मला लोकांनी निवडून दिलं आहे, त्यामुळे मला त्यांच्यासाठी काम करायचं आहे. पण दु:ख एवढंच आहे की, महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे? तसेच तुम्हाला विभागीय दिले जायचे. तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ यासारख्या लोकांच्या हातात सत्ता देत महाराष्ट्र आम्ही पुढे नेला होता. परंतु, आपण कुठे तरी आता मागे चाललोय. तसेच आपण बिहारच्या मार्गाने चाललोय” असं देखील विजय शिवतारे म्हणाले आहेत.

Shivsena l मला मंत्रिपदाची मला गरज नाही :

याशिवाय मला नाव कट झाल्याबद्दल अजिबात दु:ख नाही. पण ज्या पद्धतीने विश्वासात घेऊन काम करायला हवं, पण ते न झाल्याने 100 टक्के माझी नाराजी आहे. कारण आता अडीच वर्षानंतर मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही. कारण मला मंत्रिपदाची मला गरज नाही.

माझ्या मतदारसंघातील कामे मुख्यमंत्री आणि इतरांकडून करुन घेणे, इतकंच माझं काम आहे. त्यामुळे मंत्रिपदावरुन मला राग नाही. पण वागणुकीवरुन मात्र मला प्रचंड राग आहे” असं देखील शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी म्हटले आहे.

News Title :  Shivsena MLA vijay shivtare Get angry to mahayuti

महत्वाच्या बातम्या –

मंत्रिपदापासून वंचित असलेले भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?, थेट म्हणाले…

राज्यातील तब्बल 17 जिल्हे मंत्रिपदापासून वंचित; पाहा त्या जिल्ह्यांची यादी

“जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस..”; मंत्रीमंडळात डावलल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया

छगन भुजबळ होणार उपमुख्यमंत्री?, ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

महायुतीमध्ये तणाव!…म्हणून भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now