महायुतीमध्ये तणाव!…म्हणून भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे

On: December 16, 2024 12:09 PM
Diesel Crisis
---Advertisement---

BJP l महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल 15 डिसेंबरला पार पडला आहे. यावेळी मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. तसेच या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. परंतु, या मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये नाराजी नाट्य सुरु झाले आहे.

महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये नाराजी :

मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होण्यापूर्वीच मंत्रिपद न मिळाल्यामुळे शिवसेनेच्या नरेंद्र भोंडेकर यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील नाराज झाले आहेत. अशातच आता भाजपमधील नाराजी देखील समोर आली आहे. भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील राजीनामे दिले आहे.

यावेळी पूर्व नागपूरातील भाजपच्या मंडळ अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे राजीनामे पाठवले आहेत. तसेच भाजप शहर अध्यक्ष तिजेंद्र कुकडे यांच्याकडे देखील त्यांनी राजीनामे दिले आहे. याशिवाय पुढील भुमिका ठरवण्यासाठी आज पूर्व नागपूर येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी बैठक बोलवली आहे.

BJP l मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांची निराशा :

विधानसभा निवडणुकीत पूर्व नागपुर विधानसभा मतदारसंघातून आमदार कृष्णा खोपडे यांनी दीड लाखापेक्षा जास्त मतांनी चौथ्यांदा विजय मिळवला आहे. मात्र यावेळी तरी त्यांना मंत्रीपद मिळेल अशी आशा होती. परंतु, यंदाच्या वर्षी देखील त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन कार्यकर्ते त्यांची नाराजी व्यक्त करणार आहे.

याशिवाय महायुतीमधील घटकपक्ष असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी देखील मंत्रिमंडळात पक्षाला स्थान न मिळाल्यामुळे उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

News Title : BJP, ShivSena, NCP are unhappy due to not getting a place in the cabinet

महत्वाच्या बातम्या –

अधिवेशनात ‘या’ मुद्यांवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होणार?

“…तर फडणवीसांचं 90 टक्के मंत्रीमंडळ रिकामं होईल”; राऊतांचं वक्तव्य

मंत्रीमंडळात डावलल्याने छगन भुजबळ नाराज, घेणार मोठा निर्णय?

महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रीपद नेमकं कुणाला?

कलाविश्वात शोककळा! जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचं निधन

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now