पुणेकरांची प्रतीक्षा लांबली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो प्रकल्पाबाबत सर्वात मोठी बातमी!

On: December 29, 2025 12:33 PM
Khed Shivapur Metro Plan
---Advertisement---

Shivajinagar-Hinjewadi Metro | पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून, शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गासाठी पुणेकरांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सध्या पुण्यात पिंपरी-चिंचवड (PCMP) ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी हे दोन मेट्रो मार्ग सुरू असताना, तिसऱ्या मेट्रो मार्गाची नागरिक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ( Metro Line 3 Update)

पीएमआरडीए अर्थात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विकसित होत असलेला शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो प्रकल्प पुण्यातील पहिलाच पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) तत्त्वावर राबवला जाणारा प्रकल्प आहे. आयटी हब असलेल्या हिंजवडीसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा होती.

डिसेंबर 2025 ची डेडलाईन चुकली, काम अजूनही अपूर्ण :

या मेट्रो मार्गाबाबत सुरुवातीला मार्च 2026 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल अशी चर्चा होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकल्पाकडे लक्ष देत, काम पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 2025 ची डेडलाईन निश्चित केली होती. मात्र, डिसेंबर महिना संपत असतानाही प्रकल्पाचे सुमारे 9 टक्के काम अद्याप बाकी असल्याची माहिती समोर आली आहे. (Shivajinagar-Hinjewadi Metro News)

याच कारणामुळे आता हा मेट्रो मार्ग वेळेत सुरू होणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. अपूर्ण कामामुळे पुणेकरांना आणखी सहा महिने प्रतीक्षा करावी लागू शकते आणि त्यामुळे संपूर्ण मार्ग सुरू होण्यासाठी सप्टेंबर 2026 पर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Shivajinagar-Hinjewadi Metro | 2026 मध्येही मेट्रो पूर्ण क्षमतेने धावणार नाही? :

विशेष म्हणजे, 2026 मध्ये हा मेट्रो मार्ग सुरू झाला तरी तो पूर्ण क्षमतेने सुरू होणार नाही अशी माहिती प्रशासनाकडून मिळत आहे. या मार्गावर एकूण 23 स्थानके विकसित केली जात असून, त्यापैकी तब्बल 11 स्थानकांचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे ही स्थानके वगळून उर्वरित मार्ग सुरू करण्याचा पर्याय प्रशासनाकडून विचाराधीन आहे. (PMRDA Metro Project)

हा मेट्रो मार्ग 23.3 किलोमीटर लांबीचा असून, त्याचे काम 2021 मध्ये सुरू झाले होते. सुरुवातीला या प्रकल्पासाठी मार्च 2025 ची मुदत देण्यात आली होती, मात्र काम पूर्ण न झाल्याने मुदत वाढवण्यात आली. आता मार्च 2026 पर्यंत देखील संपूर्ण मेट्रो मार्ग सुरू होणार नसल्याचे संकेत मिळत असल्याने, पुणेकरांची प्रतीक्षा आणखी लांबणार असल्याचे स्पष्ट होत आहे. अद्याप अपूर्ण असलेली स्थानके वगळून 2026 च्या सुरुवातीला मेट्रो सुरू होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Title: Shivajinagar-Hinjewadi Metro Project Faces Delay, Pune Citizens May Have to Wait Till September 2026

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now