भाजपला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्यानी केला उद्धव ठाकरे गटात प्रवेश

On: April 24, 2024 12:27 PM
Uddhav Thackeray
---Advertisement---

Uddhav Thackeray l लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच प्रचाराचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे दोन दिवसांनी म्हणजेच 26 एप्रिलला होणार आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील बड्या नेत्यांच्या मतदारसंघात सभा होत आहेत. अगदी काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

धाराशिवचे शिवाजी कांबळे यांची घरवापसी :

अशातच आता मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. धाराशिवचे भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार शिवाजी कांबळे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. धाराशिवमध्ये शिवाजी कांबळे यांचे चांगले वर्चस्व आहे. ते दोन वेळा खासदार राहिले आहेत. तसेच ते पक्षाच्या प्रदेश कमिटीत पदाधिकारी देखील आहे. मात्र त्यांच्या तडकाफडकी घरवापसीमुळे भाजपला मोठा धक्का बसणार आहे.

शिवाजी कांबळे यांनी 1996 व 1999 साली धाराशिव लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाकडून दोन वेळा विजय मिळवला आहे. त्यानंतर 1998 मध्ये त्यांनी निवडणूक लढवली होती. परंतु काँग्रेस उमेदवार अरविंद कांबळे यांनी त्यांना पराभूत केले. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला सोडचिठी देऊन भाजप मध्ये गेले होते.

Uddhav Thackeray l शिवाजी कांबळे हे भाजपच्या प्रदेश कमिटीत पदाधिकारी होते :

भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार शिवाजी कांबळे हे सध्या भाजपाच्या प्रदेश कमिटीमध्ये पदाधिकारी देवगिल होते. कांबळे यांनी काँग्रेसच्या बालकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम त्यांनी केले होते. त्यावेळी शिवसेनेच्या शिवाजी कांबळे यांनी अरविंद कांबळे यांचा पराभव करून धाराशिव लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा झेंडा देखील फडकाविला होता. मात्र त्यांनी आता पुन्हा भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे.

शिवाजी कांबळे यांनी दोनवेळा विजय मिळवला :

1996 साली– 15,919 मतांनी शिवाजी कांबळे विजयी

शिवाजी कांबळे : शिवसेना = 1,98, 521 मते

अरविंद कांबळे : काँग्रेस = 1,82,602

1999 साली – 59,073 मतांनी शिवाजी कांबळे विजयी

शिवाजी कांबळे : शिवसेना = 2,52,135

कानिफनाथ देवकुळे : राष्ट्रवादी = 1,93,062

1998 साली – 47,018 मतांनी शिवाजी कांबळे पराभूत

अरविंद कांबळे : काँग्रेस = 2,80,592

शिवाजी कांबळे : शिवसेना = 2,33,574

News Title : shivaji kamble Joined uddhav thackeray shivsena

महत्त्वाच्या बातम्या-

विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, ‘छावा’ चित्रपटाच्या शुटींगदरम्यानचे फोटो व्हायरल

अप्पी आमची कलेक्टर मालिकेला धक्कादायक वळण, अर्जुनला सोडून जाणार अप्पी?

दुबईत संगीत सेरेमनी तर लंडनमध्ये सातफेरे, ‘असा’ होणार राधिका-अनंत अंबानीचा शाही विवाह सोहळा

शुभमन गिल सारासोबत ब्रेकअप करून ‘या’ तरुणीच्या प्रेमात दंग

राज्यातील ‘या’ भागांना अवकाळीचा तडाखा बसणार, हवामान विभागाचा इशारा

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now