Shivaji Adhalrao Patil | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या अर्ज प्रकिया भरणं सुरू आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांना उमेदवारी निश्चित असल्याची चर्चा आहे. अमोल कोल्हेंविरोधात माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) हे शिरूर मतदरासंघातून निवडणूक लढणार आहे. आज ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत सांगितलं, असं आढळराव पाटील म्हणाले आहेत. माध्यमांशी बोलत असताना आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) यांनी टीकेचे बाण सोडले आहेत.
आढळराव पाटलांचा कोल्हेंवर हल्ला
“2019 मध्ये अमोल कोल्हे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ती त्यांची बेडूक उडी होती. तिन्ही पक्षामधून मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला सांगितलं की, महायुतीमधून राष्ट्रवादीतून लढायला मी तयार झालो. आता मी महायुतीचा उमेदवार आहे. मी पक्ष बदलला आहे. पण याचा अर्थ मी गद्दारी केली असं नाही”, असं आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) म्हणाले.
आज पक्षप्रवेश
“गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या प्रवेशाची चर्चा आहे. ही जागा महायुतीतून कोणाकडे जाते. यासाठी हा विषय रखडला होता. मात्र आता हे स्पष्ट झालं आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जात आहे. म्हणून मी तिन्ही पक्षाच्या सहमतीने उमेदवार म्हणून निवड करण्यात आली. त्याचाच भाग म्हणून आजचा पक्षप्रवेश आहे. मागच्या निवडणुकीला आमदारापेक्षा जनता माझ्याबाजूला उभी राहिली होती. यावेळी परिस्थिती वेगळी आहे. माझ्या बाजूनं पाच आमदार आहेत”, असं आढळराव पाटील म्हणाले आहेत.
“अजित पवार प्रचार करणार”
मी तिन्ही पक्षाच्या संगमतीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवावी असं तिन्ही पक्षांनी ठरवलं आहे. पाच आमदार माझ्यासोबत आहेत. अजित पवार आणि पक्ष यामध्ये समन्वय साधून प्रचार करणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.
“आज मला उमेदवारी जाहीर करण्यात येणार किंवा नाही हे माहिती नाही, पण महायुतीचा उमेदवार मीच असणार आहे”, असं आढळराव पाटील म्हणाले आहेत.
News Title – Shivaji Adhalrao Patil Tount To Amol kolhe
महत्त्वाच्या बातम्या
‘या’ राशींसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार!
विराटने पुन्हा दाखवून दिलं; भर मैदानात व्हिडिओ कॉलवर दिला फ्लाइंग किस
ऐश्वर्याने अखेर मौन सोडलं, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केला मोठा खुलासा!
“आम्ही फक्त लढाई हरलोय पण…”, गब्बर धवनने रणशिंग फुंकले!
कोहलीसाठी काहीपण! चाहत्याने भर मैदानात केलं असं काही की प्रेक्षक पाहतच राहिले






