सर्वात मोठी बातमी; एकनाथ शिंदे यांनाच शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण

On: February 17, 2023 7:36 PM
---Advertisement---

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून याकडे लक्ष लागलं होतं. 78 पानांची निवडणूक आयोगाचे निकालपत्र असून ऑक्टोबर २०२२ पासून हे प्रकरण चर्चेत आले होते. याशिवाय शिवसेना नाव देखील एकनाथ शिंदे गटाला मिळालंआहे.

यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. पक्षाचं नाव आणि चिन्ह हे दोन्हीही शिंदे यांना मिळाल्यानं आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. राज्याच्या राजकारणाला मोठं वळण देणारा निर्णय आता जाहिर झाला आहे.

निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता. त्यानंतर कधीही निकाल येणं अपेक्षित होतं. त्यानुसार आज संध्याकाळी निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आलाय. या निकालामुळे ठाकरे गटाला खूप मोठा झटका मिळाल्याचं मानलं जातंय.

ठाकरे गटाच्या वकिलांनी पक्षाची घटना, राष्ट्रीय कार्यकारणी, प्रतिनिधी सभा या बद्दलचे मुद्दे मांडत जोरदार युक्तिवाद केला होता. पण ठाकरे गटाचे हे सर्व प्रयत्न अखेर निष्फळ ठरले आहेत

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now