“रात्री जेवणानंतर ते खोलीत…”, शिरीष महाराजांच्या कुटुंबीयांनी दिली महत्त्वाची माहिती

On: February 5, 2025 5:04 PM
shirish maharaj
---Advertisement---

Shirish Maharaj More | देहू नगरीतून एक अत्यंत दु:खद आणि हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज असलेले ह.भ.प. शिरीष महाराज मोरे (Shirish Maharaj More) यांनी आज (शुक्रवार, 5 फेब्रुवारी) सकाळी देहू येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट (Suicide Note) लिहून ठेवली असून, त्यात आर्थिक विवंचनेतून (Financial Problems) आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण देहू नगरी आणि वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

राहत्या घरी घेतला गळफास

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शिरीष महाराज मोरे (Shirish Maharaj More) यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेतला. मंगळवारी रात्री जेवणानंतर ते आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते.

मात्र, आज (5 फेब्रुवारी) सकाळी बराच वेळ होऊनही त्यांनी दार न उघडल्याने आणि आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडला. त्यावेळी शिरीष महाराज मोरे यांचा मृतदेह खोलीत उपरण्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे.

सुसाईड नोटमध्ये काय लिहिले?

शिरीष महाराज मोरे (Shirish Maharaj More) यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे. “आर्थिक परिस्थिती बेताची होती. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत आहे,” असे या सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिल्याचे देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितले आहे.

लग्नाच्या तोंडावर काळाचा घाला:

विशेष म्हणजे, अवघ्या 20 दिवसांपूर्वी शिरीष महाराज मोरे यांचा साखरपुडा झाला होता आणि लवकरच ते विवाहबद्ध होणार होते. मात्र, लग्नाच्या तोंडावरच त्यांनी आपले आयुष्य संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. उदरनिर्वाहासाठी ते प्रवचन आणि कीर्तन करायचे. त्यांचे निगडी येथे एक इडलीचे उपहारगृह देखील होते. मात्र, त्यातून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते, त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती.

देहू नगरीत शोककळा-

संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज असलेल्या शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येच्या बातमीने संपूर्ण देहू नगरीत शोककळा पसरली आहे. या घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत. शिरीष महाराज मोरे यांच्या पार्थिवावर आज दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

News Title : Shirish Maharaj More family gave information

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now