एकनाथ शिंदेंचा आतापर्यंतचा मोठा गौप्यस्फोट!

On: October 25, 2023 8:47 AM
---Advertisement---

मुंबई | मुंबईतील आझाद मैदानावर शिंदे गटाचा ‘दसरा मेळावा’ पार पडला. या मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी आतापर्यंतचा मोठा गौप्यस्फोट केलाय.

बाळासाहेबांना मी शब्द दिला आहे शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार, आम्ही विचारात पडलो कुठल्या शिवसैनिकाला बसवणार? मात्र हे महाशय टुनकन उडाले आणि खुर्चीत जाऊन बसले. मागचं पुढचं सगळं सोडलं आणि म्हणाले मला कुठे व्हायचंय, पवार साहेबांनी सांगितलं. यांनी पवारांकडे दोन माणसे पाठवली होतीत आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करा अशी विनंती केली, असं शिंदेंनी सांगितलं.

मुख्यमंत्री व्हायचंच होतं मात्र दाखवायचं नव्हतं, एक चेहरा आहे पण त्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे दडले आहेत. भोळेपणाने तिकडे आहेत त्यांनी सावध व्हावं, चेहऱ्यावर जावू नका, असं शिंदे म्हणाले.

जे बाळासाहेबांचे होऊ शकत नाहीत, ते तुमचे-आमचे काय होणार? हा विचार करण्याची आवश्यकता आहे. एकदा का त्यांनी एखाद्याचा काटा काढायचं ठरवलं, तर ते बरोबर काटा काढतात. याची उदाहरणं मी याठिकाणी देऊ इच्छित नाहीत, अशी टीका शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीये.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now