‘…तर आयुष्यभर तुमचे पाय चेपेन’; शिंदे गटाच्या खासदाराचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज

On: November 29, 2022 4:29 PM
---Advertisement---

बुलडाणा | बाळासाहेबांच्या शिवसेना गटाचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिला आहे. हिंमत असेल तर बुलढाणा येथून लोकसभा निवडणूक लढवा, असं आव्हान जाधव यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.

प्रतापराव जाधव यांनी दिलेल्या आव्हानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजलीये. तुम्ही भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार नाही तसं जाहीर करा, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत महिलांचा एक गट नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर देखील शिंदे गटात सामील झालेले खासदार प्रतापराव जाधव यांनी सडकून टीका केली आहे.

ज्या ठिकाणी मुर्खांचा बाजार भरतो, त्या ठिकाणी गोंधळ झाल्याशिवाय राहत नाही. आता तिथे सर्व उपरे लोक भरले आहेत, असं खासदार जाधव म्हणालेत.

खोके आणि बोके.. खोक्यांशिवाय गेल्या तीन-चार महिन्यांत त्यांना दुसरा कुठला विषय मांडता आला का? उद्धव ठाकरेंनी सीआयडी वगैरे जेवढ्या यंत्रणा असतील, त्या लावून या खोक्यांचा एक तरी पुरावा आणून दाखवावा, असं जाधव म्हणालेत.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी जर पुरावे दिले नाहीतर त्यांचे आयुष्यभर पाय चेपेन, असंही प्रतापराव जाधव म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now