राऊतांविरोधात शिंदे गट आक्रमक; ‘हा’ मोठा निर्णय घेणार

On: February 21, 2023 2:35 PM
---Advertisement---

मुंबई | निवडणूक आयोगाचा (Election commission) निर्णय आल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath shinde) गट अधिक आक्रमक झाल्याचं चित्र पहायला मिळतंय. शिंदे गट मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिंदे गटातील शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची महत्त्वाची बैठक आज बोलवली आहे. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे.

बैठकीला शिंदे गटाचे सर्व आमदार-खासदार (Mla) उपस्थित राहणार आहे. याच बैठकीत संजय राऊत (Sanjay Raut) यांचं संसदीय प्रमुख पद काढून घेतलं जाणार असल्याची चर्चा आहे. तर शिवसेनेचं पक्ष प्रमुख पद स्वीकारणार असल्याचीही चर्चा आहे.

शिवसेनेची सगळी कार्यालये आणि पदांचा ताबा शिंदे गट घेत आहे. यावरून संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिलीये.

कार्यालयांचा ताबा ते घेतील. पण महाराष्ट्रातील जनता खवळली आहे. त्यांचा ताबा कोण घेणार?, असं संजय राऊत म्हणालेत. तसेच शिवसेना खतम करण्यासाठी आपल्या देशात दिल्लीश्वरांनी 60 वर्षांपासून प्रयत्न सुरु केले. वेळोवेळी ते आम्ही हाणून पाडले, असंही राऊत म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now