सर्वसामान्यांना शॉक; शिंदे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

On: November 24, 2022 2:48 PM
---Advertisement---

मुंबई | शिंदे सरकार जनतेला मोठा झटका देण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. राज्यात लवकरच वीज दरवाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा एकदा वीज दरवाढ होणार आहे. 60 पैसे प्रति युनिट वाढ होणार आहे. यामुळे वीज बिल किमान 200 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात विजेच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने आधीच घेतला आहे. आता नोव्हेंबर महिन्यात पुन्हा दरवाढ होणार आहे. 

सध्या हे शुल्क 1.30 रुपये प्रति युनिट इतके आहे. आता पुढील महिन्यात महावितरण 60 ते 70 पैशांची वाढ करणार आहे. त्यामुळे इंधन शुल्कचा दर हा 2 रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. वीज खरेदीपोटी महावितरणला जवळपास 40 हजार कोटी रुपयांची वसुली गरजेची आहे. त्यामुळे वीज दरवाढ केली जाणार आहे.

राज्यात महानिर्मिती 7 औष्णिक वीज प्रकल्पांमधून 30 संचांद्वारे वीजनिर्मिती करत असते. सप्टेंबर अखेरपर्यंत कंपनीला 34 हजार 806 कोटींचा वीज खरेदी खर्च आला. त्यामुळे आता याचा खर्च आता सर्वसामान्यांकडून वसूल केला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now