मोठी बातमी! शिंदे सरकारनं शेतकऱ्यांना दिली मोठी खुशखबर

On: November 30, 2022 3:30 PM
---Advertisement---

मुंबई | नुकतीच केंद्र सरकारनं(Central Goverment) शेतकऱ्यांना गुड न्यूज दिली आहे. केंद्र सरकरानं किटकनाशके ऑनलाईन विक्री करण्याची परवानगी दिली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. त्याच पाठोपाठ आता शिंदे सरकारनंही(Shinde Goverment) शेतकऱ्यांना खुशखबर दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ऊसाला एक रकमी एफआरपी दिली जावी, अशी मागणी शेतकरी सरकारकडं करत होते. अनेक शेतकरी संघटना आणि काही राजकीय पक्षांनी यासाठी आंदोलने देखील केली. याबाबत आता राज्य सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

मंगळवारी ऊस उत्पादकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत सरकारनं ऊस उत्पादकांना एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं शेतकरी आनंदी दिसत आहेत.

यावेळी शिंदे म्हणाले की, ऊस उत्पादकांच्या मागणीला हे सरकार सकारात्मक असून, सरकारनं शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शिंदेंनी हेही सांगितलं आहे की, दोन साखर कारखांन्यांमध्ये असलेले हवाई अंतराबाबतही सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत सरकार आहे.

तसेच या बैठकीत आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढच्या हंगामापासून साखर कारखान्यांमध्ये डिजीटल वजन काटे सुरू करण्याचा आदेशही शिंदेंनी कारखान्यांना दिला आहे. गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांना ऊस वाहतूकदारांच्या समस्यांबाबत पत्र देण्याचा आदेशही शिंदेंनी दिला आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी यावेळी सांगितलं आहे की, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी मोठा प्रकल्प सरकारनं हाती घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now