अभिनेत्री शिल्पा शेट्टीला मोठा झटका, तब्बल ‘इतक्या’ कोटींची मालमत्ता जप्त

On: April 18, 2024 9:06 PM
---Advertisement---

Shilpa Shetty | बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. शिल्पा तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे देखील अनेकवेळा चर्चेचा विषय बनली आहे. शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा या दोघांच्या अढचणीत वाढ झाली आहे. एवढंच नाहीतर यांची मालमत्ता देखील जप्त करण्यात आली आहे. आज (18 एप्रिल) रोजी सकाळच्या सुमारास ईडीने ही कारवाई केली आहे.

काय आहे प्रकरण?

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि पती राजकुंद्र यांना ईडीकडून नोटीस आली आहे. मनी लाॅंड्रिंग प्रकरणात या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकांना गुंतवणुकीच्या बदल्यात 10% परतावा दर महिन्याला देणार असल्याचं अमिष दाखून मोठा बिटकाॅन घोटाळा केल्याचा आरोप राज कुंद्रावर लावण्यात आला आहे. बिटकॉइन प्रकरणात फायदा करवून घेऊन राज कुंद्रा सध्याच्या घडीला 150 कोटींच्या फायद्यात असल्याचही ईडीचं म्हण आहे.

ईडीकडून फ्लॅट जप्त-

ईडीनी केलेल्या कारवाईमुळे बाॅलिवूडमध्ये एकच चर्चा रंगली आहे. जुहूमधील शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांच्या नावे असलेला फ्लॅट, पुण्यातील बंगला तसेच इक्विटी शेअर्सही ईडीकडून जप्त करण्यात आला आहे.

 

राज कुंद्रावर आधीचे गुन्हे-

राज कुंद्रा यांचं नाव आयपीएलच्या सट्टेबाजीतही आलं होतं. शिल्पा आणि कुंद्रा हे आयपीएलची टीम राजस्थान रॉयल्सचे सह मालक होते. या प्रकरणात राज कुंद्रा यांची चौकशी झाली होती. त्यावेळी त्यांनी फिक्सिंगचा गुन्हा कबुल केला होता. त्यानंतर राजस्थानवर दोन वर्षाचा बॅन लावण्यात आला होता.

तर पोर्नोग्राफी प्रकरणामुळे 2021 साली राज कुंद्राला अटक करण्यात आली होती. अश्लील व्हिडीओ बनवल्याचा आरोप राज कुंद्रा याच्यावर होता, त्यानंतर त्याला शिक्षा झाली आणि तुरूंगातही जावे लागले.

News Title : shilpa shetty flat seized by ED

महत्त्वाच्या बातम्या-

तीन दिवसांत घडलेल्या तीन घटनांनी पुणे हादरलं!

“हे राम, मामींना ऑस्कर देऊन टाका”, अमृता फडणवीसांना नेटकऱ्यांनी पुन्हा केलं ट्रोल

“ही लढाई नाचीशी नाहीये, डान्सरशी नाहीये तर…”, नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांचा तोल सुटला

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिंदे गटानं का घेतली माघार?, उदय सामंत यांनी सांगितलं खरं कारण

पंकजा मुंडेंची मनोज जरांगेंवर पहिल्यांदाच टीका, थेट म्हणाल्या..

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now