Sharmila Thackeray | “मी पुतण्यावर विश्वास ठेवला, तसा तुम्ही तुमच्या भावावर ठेवलात का?”

On: December 19, 2023 1:51 PM
Sharmila Thackeray
---Advertisement---

मुंबई | दिशा सालियनप्रकरणी माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर आरोप करण्यात आलेत. या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. अशावेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या काकू आणि राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) त्यांच्या मदतीला धावून गेल्या.

आदित्य ठाकरेंवर करण्यात आलेल्या आरोपांवर शर्मिला ठाकरेंनी प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरेंची बाजू घेतल्याचं पाहायला मिळालं. आदित्य असं काही करेल असं वाटत नाही, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. त्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhaav Thackeray) यांनी शर्मिला ठाकरे यांचे आभार मानले आहेत. यावर शर्मिलांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय.

उद्धव ठाकरेंनी आम्हाला आभार मानायची संधी त्यांनी कधीच आम्हाला दिली नाही. लहान भावाला कायम बोलतात, टोमणे मारायची संधी सोडत नाहीत.मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला. मात्र आम्हाला अजून आभार मानायची वेळ आली नाही. लहान भावाला कायम बोलतात टोमणे मारायची संधी सोडत नाहीत, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्यात.

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, दीड वर्षांपूर्वी अदानी मातोश्रीवर भेटायला कशाला गेले होते हे तुम्ही शोधा. उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते त्यांचे हात धरले होते का? चांगले निर्णय घ्यायला त्यांना कोणी थांबवलं होतं?, असा सवाल शर्मिला ठाकरेंनी केलाय.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत बसला होतात. धारावीचा पुनर्वीकास करायचा होता. मग तुम्ही का केला नाही? असा सवाल करतानाच साहेबांनी याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे, असं शर्मिला ठाकरेंनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

Supriya Sule | आताची मोठी बातमी; सुप्रिया सुळेंचं लोकसभेतून निलंबन

Naveen-Ul-Haq | मोठी बातमी! ‘या’ स्टार खेळाडूवर 20 महिन्यांची बंदी

Rain Update | पुढील 24 तासांत अवकाळी पावसाचा इशारा!

Eknath Shinde | शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंनी विधानसभेत केली मोठी घोषणा!

Dawood Ibrahim | पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड?; दाऊदबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now