Share Market | गुंतवणूकदारांना फायदाच फायदा; मोदींच्या घोषणेनंतर ‘हा’ शेअर सुसाट

On: January 23, 2024 4:17 PM
Share Market
---Advertisement---

Share Market |  इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (IREDA) या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना आधीच चांगला परतावा दिला आहे. आता हा शेअर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) एका घोषणेमुळे आणखी वधारण्याची शक्यता आहे.

मोदींच्या घोषणेनंतर ‘हा’ शेअर सुसाट

अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सरकार 1 कोटी घरांवर छतावरील सौरऊर्जा बसवण्याच्या लक्ष्यासह प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. मोदींच्या घोषणेमुळे हा स्टॉक्स आता आणखी सुसाट पळण्याची शक्यता आहे.

Share Market | गुंतवणूकदारांना फायदाच फायदा

IREDA ने नोव्हेंबर 2023 मध्ये 32 रुपयांच्या इश्यू किमतीत IPO आणला होता आणि स्टॉक एक्सचेंजमध्ये 29 नोव्हेंबर रोजी सूचीबद्ध झाला होता. IREDA चे शेअर्स शनिवार, 20 जानेवारी 2024 रोजी 148.85 रुपयांवर बंद झाले, जे त्याच्या IPO किमतीपेक्षा 117 रुपयांनी जास्त होते.

दोन महिन्यांतील IREDA च्या स्टॉकची हालचाल पाहिली तर 2024 मध्येच स्टॉकमध्ये 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर एका आठवड्यात स्टॉक 34 टक्के आणि एका महिन्यात 42 टक्क्यांनी वाढला आहे. आणि सूचीच्या तारखेपासून स्टॉक 365 टक्क्यांनी वाढला आहे.

अलीकडे IREDA ने PM-KUSUM योजना, रूफटॉप सोलर आणि इतर B2C क्षेत्रांना कर्ज देण्यासाठी किरकोळ विभाग तयार केला आहे. IREDA च्या किरकोळ विभागाने कुसुम-बी योजनेअंतर्गत 58 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं आहे. मोदी सरकारच्या 1 कोटी घरांवर रुफटॉप सोलर बसवण्याच्या योजनेचा फायदा IREDA ला होऊ शकतो, असा विश्वास आहे.

IREDA (Indian Renewable Energy Development Agency) चा IPO 21 ते 23 नोव्हेंबर 2023 दरम्यान उघडण्यात आला. कंपनीने 32 रुपये प्रति शेअर या इश्यू किंमतीने बाजारातून (Share Market) 2150.21 कोटी रुपये उभे केले होते. ज्या गुंतवणूकदारांना IREDA चे समभाग IPO मध्ये मिळाले त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळाला.

महत्त्वाच्या बातम्या- 

Bigg Boss 17 | ‘हा’ तगडा स्पर्धक बिग बॉसधून बाहेर; टॉप 5 नावे बघून चाहत्यांना मोठा धक्का

Kangana Ranaut | ‘बागेश्वर बाबांना मिठी मारण्याची इच्छा होती पण…’; कंगणाचं मोठं वक्तव्य

Saif Ali Khan च्या प्रकृतीबद्दल सर्वांत मोठी अपडेट समोर!

Bigg Boss 17 | ‘तुला अंकितापेक्षा कोळशाच्या खाणीचा अहंकार…’; मिडियाने विकी जैनला सुनावलं

Narendra Modi | अयोध्येतून दिल्लीत परतताच नरेंद्र मोदींची मोठी घोषणा!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now