पत्रकार परिषद घेत शरद पवारांची मोठी घोषणा!

On: April 11, 2024 5:18 PM
Sharad pawar
---Advertisement---

पुणे | माढा लोकसभा मतदारसंघातले नाराज धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी शरद पवारांची भेट घेतलीये. त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातला प्रवेश निश्चित झाला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिलीये.

शरद पवारांची मोठी घोषणा

धैर्यशील मोहिते पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या आधी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत अकलूज येथे एक मेळावा घेण्याचं नियोजन असल्याची माहिती समोर आलीये. त्यानंतर 16 एप्रिल रोजी सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासोबत ते अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.

वेट अँड वॉच- धैर्यशील मोहिते पाटील

शरद पवार आणि मोहिते पाटील कुटुंबाचे संबंध जुने आहेत त्यामुळे त्यांची भेट घेतली असं सांगत माढ्याबाबत ‘वेट अँड वॉच’, अशी प्रतिक्रिया दिली.

धैर्यशील मोहिते पाटलांचे चुलत बंधू रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मोहिते पाटील घराण्यातील बंडखोरी टाळण्यासाठी शर्थी प्रयत्न केले. मात्र तरीही धैर्यशील पाटील यांनी बंडखोरी करायच ठरवलं असून ते माढ्यातून अर्ज भरणार आहेत.

शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील आणि शेकापचे अनिकेत देशमुख यांच्या नावांची चर्चा सुरु होती. दरम्यान याच पार्श्वभूमीवर अनिकेत देशमुख (Aniket Deshmukh) यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली होती.

आता भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ सरकारी योजनांमध्ये करा गुंतवणूक; मिळेल दुप्पट परतावा

मोठी बातमी! अभिनेता अक्षय कुमारच्या नावे तरुण मुलीची फसवणूक

अभिनेत्री समंथाने पतीची फसवणूक केली?, घटस्फोटाच्या अडीच वर्षांनी अखेर सत्य समोर

सारानंतर कुणाला डेट करतोय कार्तिक आर्यन?, स्वतःच खुलासा करत म्हणाला…

“…त्यातून हे बाळ जन्माला आलं”, पूजा तडस यांचा मोठा खुलासा, राजकारणात खळबळ

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now