“ती भांडखोर आहे फार, तिला आवरावं लागतं”

On: February 24, 2023 10:40 PM
---Advertisement---

पुणे | रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil) या राष्ट्रवादीच्या फायरब्रँड नेत्या आहेत. डिसेंबर 2021 च्या आधी त्या मनसेत होत्या. पुणे मनसेचा आक्रमक आणि लढवय्या चेहरा म्हणून त्या ओळखल्या जात होत्या. मात्र त्यांनी मनसे सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला.

रूपाली ठोंबरे या माजी नगरसेविका आहेत. त्यांच्याविषयी शरद पवार यांना प्रश्न विचारला असता ती भांडखोर आहे फार आहे. पोलिसांनी प्रश्न विचारला की त्यांच्या अंगावर जाते. तिला आवरावं लागतं असं शरद पवारांनी म्हटलं आहे

शरद पवार यांना आज पत्रकारांनी रूपाली ठोंबरे पाटील यांच्याविषयी एक प्रश्न विचारला. त्यावर कुणाविषयी बोलताय? असं शरद पवार म्हणाले मग रुपाली ताई ठोंबरे पाटील असं पत्रकाराने सांगितल्यावर शरद पवार चटकन म्हणाले भांडखोर आहे.

डिसेंबर 2021 मध्ये रूपाली पाटील यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिली आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मनसेच्या फायरब्रँड नेत्या अशी रूपाली पाटील यांची ओळख होती. त्यांनी राज ठाकरेंना एक पत्र लिहून पक्ष सोडला.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now