शरद पवारांचं देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज; थेट म्हणाले..

On: February 28, 2024 1:40 PM
Maharashtra
---Advertisement---

Sharad Pawar | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काल (27 फेब्रुवारी) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे आदेश दिले. काल सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचं (Sharad Pawar ) नाव घेत मोठं वक्तव्य केलं.

मनोज जरांगे हे राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचतात, असा आरोप फडणवीस यांनी केला होता. यावर आता स्वतः शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत थेट फडणवीस यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. त्यामुळे राजकारणात याची चर्चा रंगली आहे.

“जरांगे यांचा माझ्यासोबत संबंध बोलायचं गेलं तर त्यांचं उपोषण सुरु झाल्यानंतर मी पहिल्यांदा गेलो होतो. मी त्यांना भेटून एवढंच सांगितलं होतं की, तुमच्या मागण्या संदर्भातील आग्रह समजू शकतो. पण दोन समाजात अंतर वाढेल असं काही करु नका. महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य टिकेल, असं करा. तुमच्या समाजासाठी आग्रही समजू शकतो. पण इतर समाजासाठी हे योग्य दिसणार नाही. एवढाच त्यांचा आणि माझा संवाद झालाय. त्यानंतर आजपर्यंत एका शब्दाने माझं आणि त्यांचं बोलणं नाही किंवा भेट नाही. असं असताना उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य असभ्य वाटतंय.”, असं शरद पवार यांनी म्हटलंय.

शरद पवारांचं फडणवीसांना आव्हान

यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजेश टोपे यांच्यावर झालेल्या आरोपावरही प्रतिक्रिया दिली आहे. राजेश टोपे यांच्यावर चुकीचे आरोप लावण्यात आले आहेत. मला माहिती आहे, राजेश टोपेंची मदत राज्य सरकार घेत होतं. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार त्यांची मदत घेत होते. कारण त्यांचे ते शेजारी आहेत. एका बाजूने त्यांची मदत घेणं आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्यावर आरोप करणं ही भूमिका असेल तर काही प्रश्न निर्माण झाले तर राज्य सरकारवर कोण विश्वास ठेवेल?, असा प्रतिसवाल यावेळी पवार यांनी केला.

पुढे शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हानच दिलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “तुम्हाला हवी ती चौकशी लावा आमची काही हरकत नाही. कर नाही त्याला डर कसला. संबंधच नाही. ते म्हणतात फोन आले. मी मनोज जरांगेंना एक फोन जरी केल्याचं सिद्ध केलं तर मी वाटेल ते मान्य करेन”, असं थेट चॅलेंजच पवार यांनी दिलं.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

राजकारण आपल्या स्तरावर चालूच राहील. मात्र आज समाजाला विघटन करण्याचं काम चालू आहे. जरांगे यांचे कोणासोबत फोटो निघत आहे. कोणाचा पैसा त्याच्यामागे आहे. यासंदर्भात एक एक गोष्टी बाहेर येत आहे. कोणाकडे बैठक झाली हे आरोपी सांगत आहेत. आरोपींनी जबाबात सांगितलं की, आम्हाला दगडफेक करा असं सांगण्यात आलं होतं, असा खुलासा करत मनोज जरांगे हे शरद पवारांची (Sharad Pawar ) स्क्रिप्ट वाचत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता.

News Title :  Sharad Pawar Open Challenge To Devendra Fadnavis

महत्त्वाच्या बातम्या –

‘अरे ही तर पॉर्न किंगची बायको..’, प्रसिद्ध अभिनेत्री झाली ट्रोल

मोठी बातमी! मनोज जरांगेंनी उचललं मोठं पाऊल

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारने दिली गुड न्यूज

बाबा रामदेव यांना न्यायालयाचा ‘सर्वोच्च’ दणका; पतंजली कंपनीला फटकारले, राजकारण तापलं

‘अंकितासोबत लग्न…’; विकी जैनचा धक्कादायक खुलासा

Join WhatsApp Group

Join Now