Sharad Pawar | आगामी लोकसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीकेचे बाण सोडत आहेत. अशातच आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला केला आहे. अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्टवादी म्हटलं गेलं आहे. पण भ्रष्टाचार करणारे सगळे भाजपमध्ये आहेत, असा हल्ला शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे.
काय म्हणाले शरद पवार?
“राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आदर्श घोटाळा केला. यावर भाजपने टीका केली. त्यानंतर पाचव्या दिवशी अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेले. त्यानंतर त्यांना खासदारकी देण्यात आली. राज्य सहकारी बँक आणि जलसंपदा विभागामध्ये घोटाळा केला असा आरोप मोदी यांनी केल्यानंतर काहीजण भाजपमध्ये गेले, हिंमत असेल तर चौकशी करा”, असं आव्हान आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी नरेंद्र मोदींना केलं आहे.
“होऊन जाऊदे दुध का दुध आणि पाणी का पाणी, मात्र घडलं काय? ज्यांच्यावर आरोप केले आज ते भाजमध्ये आहेत. भाजप वॉशिंग मशिन झाली आहे. आरोप करा आणि त्यांच्या पक्षात प्रवेश करून धुवून टाका”, अशी टीका शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे.
“झारखंड, दिल्ली येथे तेच घडत आहे. नोटीस, समन्स पाठवायचं आणि तुरूंगात टाकायचं. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही लवकरच अटक केली जाईल”, असं शरद पवार म्हणाले आहेत.
“शेतकऱ्यांची आत्महत्या ही मोदींची गॅरंटी”
“पक्ष स्थापनेनंतर आम्ही विचारधारा बदलली नाही. पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषबाबू, गांधी याचं योगदान हे देश स्वातंत्र्यासाठी होतं. मोदी पानावर मोदींची गॅरंटी जाहिरात देतायत, ती कोणाच्या पैशातून जाहिरात दिली जाते. जनतेच्या पैशातून गॅरंटी दिली जाते”, असा हल्ला शरद पवार यांनी केला आहे.
“हे सांगतात शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट वाढवतो. पण दहा वर्षे झालं उत्पन्न दुप्पट वाढलं का? उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, हीच मोदींची गॅरंटी”, असा हल्ला शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला केला आहे.
News Title – Sharad Pawar On Narendra Modi News Update
महत्त्वाच्या बातम्या
चाहत्यांना मोठा धक्का; RCB चा ‘हा’ खेळाडू खेळणार शेवटचा आयपीएल सीजन
महायुतीच्या जागावाटपावर देवेंद्र फडणवीसांचं सर्वात मोठं वक्तव्य!
धक्कादायक! ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखाच्या मुलाची हत्या
प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ!
बाळासाहेब थोरातांच्या मुलीची राजकारणात एन्ट्री; मिळाली मोठी जबाबदारी






