Sharad Pawar Health Update | मागील तीन दिवसांपासून आजारी असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar Health Update) यांच्या तब्येतीत आता सुधारणा झाली आहे. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांनी दोन दिवस सार्वजनिक कार्यक्रमांना अनुपस्थिती ठेवली होती.
पुण्यात उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा
शनिवारी पुण्यात असताना शरद पवार यांच्या तब्येतीत अचानक बिघाड झाला होता. यामुळे डॉक्टरांनी त्यांना चार दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. परिणामी, त्यांचे काही नियोजित कार्यक्रम रद्द करावे लागले.
लवकरच राजकीय घडामोडींमध्ये सक्रीय होणार
शरद पवार यांच्यावर मुंबईतील त्यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak) या निवासस्थानी उपचार सुरू होते. आता त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून, ते लवकरच नियमित कामकाज सुरू करतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी दिली आहे.
गेले वर्षभर महाराष्ट्रात निवडणुकांची धामधूम पाहायला मिळाली. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका मे महिन्यात पार पडल्या. यानंतर विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात पार पडल्या. या निवडणुकानंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष हे तयारी करताना दिसत आहेत. (Sharad Pawar Health Update)
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडूनही आगामी निवडणुकांची तयारी केली जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात पक्ष बांधण्यासाठी शरद पवार महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मात्र अचानक शरद पवारांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवारांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. परंतु कार्यकर्त्यांनी काळजी करु नये, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
Title : Sharad Pawar Health Update Senior NCP Leader Recovers After Brief Illness






