Walmik Karad | बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सरपंच बापू आंधळे (Bapu andhale) यांच्या खून प्रकरणात नव वळण आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते शिवराज बांगर यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक आरोप करत सांगितले की, “बापू आंधळे यांचा खून हा वाल्मिक कराडच्या (Walmik karad) सांगण्यावरूनच झाला असून, या सर्वामागे धनंजय मुंडे यांची ताकद होती.”
या आरोपांमुळे परळीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, आघाडी सरकारच्या अंतर्गत गटबाजीचा गंभीर परिणाम होतो आहे, असा सूर अनेक राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे.
“वाल्मिक कराड हा प्यादा, धनंजय मुंडे ही मूळ ताकद” – शिवराज बांगर :
शिवराज बांगर (Shivraj bangar) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्टपणे सांगितले की, “वाल्मिक कराड हा केवळ प्यादा आहे. पण त्याच्यामागे जी ताकद आहे ती धनंजय मुंडे Dhananjay Munde) यांची आहे. त्यांच्याच सांगण्यावरून या हत्या घडवल्या गेल्या आहेत.” यासोबतच त्यांनी असेही दावा केला की, “माझ्यावरही खून करण्याचा प्रयत्न झाला होता. वाल्मिक कराडला माझे हातपाय तोडताना लाईव्ह पहायचे होते. यासाठी सनी आठवलेला सुपारी देण्यात आली होती, पण त्याने खून न केल्यामुळे त्याच्यावर खोटा गुन्हा लावण्यात आला.”
या गंभीर आरोपांमुळे मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अजून धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.
Walmik Karad | बापू आंधळे खून प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी :
२९ जून २०२४ रोजी परळी तालुक्यातील मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. हा प्रकार परळीतील बँक कॉलनी परिसरात घडला होता. सुरुवातीला जुन्या वैमनस्यातून झालेला गुन्हा म्हणून नोंदवले गेले असले तरी, आता त्यामागे राजकीय सूड असल्याचा आरोप पुन्हा उभा राहिला आहे. (Bapu andhale)
या प्रकरणात आधी बबन गित्ते, मुकुंद गित्ते, महादेव गित्ते, राजाभाऊ निहरकर आणि राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तसेच, मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडसह इतर सात जणांवर परस्पर विरोधी तक्रारींमुळे गुन्हे दाखल झाले होते. मात्र, तपास अधिकाऱ्याने वाल्मिक कराडचा (Walmik karad) सहभाग नसल्याचे सांगत त्याचे नाव वगळले होते. आता या प्रकरणाची एसआयटीमार्फत नव्याने चौकशी करावी, अशी मागणी शिवराज बांगर यांनी केली आहे.






