बारामती जिंकू म्हणणाऱ्या बावनकुळेंना शरद पवारांनी पवारांनी दिलं सणसणीत उत्तर!

On: October 22, 2023 12:43 PM
---Advertisement---

पुणे | मिशन बारामतीकडे भाजपनं (Bjp) पुन्हा लक्ष केंद्रीत केल्याचं पाहायला मिळत आहे. मागील अनेक दिवसांपासून भाजपने बारामती जिंकण्यासाठी फिल्डींग लावली आहे. अशात बारामती (Baramati) लोकसभेची जागा मोठ्या फरकानं जिंकणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणालेत.

बावनकुळेंनी याआधी देखील बारामकी जिंकू असा दावा केलाय. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

चंंद्रशेखर बावनकुळे हे पक्षाच्या उमेदवारी तिकिट देण्यायोग्य नाही. त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचं काहीही कारण नाही. त्यांना भाजपनं तिकिट नाकारलं त्यामुळे त्यांच्याबाबत काही बोलू नये, अशा शब्दांत शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लगावला आहे. 

दरम्यान, बारमती मतदार संघाअंतर्गत सहा विधानसभा मतदार संघ येतात. यापैकी दौंड मतदार संघातून भाजप पुरस्कृत राहुल कुल, बारामतीतून खुद्द अजित पवार आमदार आहेत. याशिवाय इंदापूरमधून अजित पवार समर्थक दत्ता भरणे आमदार आहेत. भोर मतदार संघातून काँग्रेसचे संग्राम थोपटे आणि पुरंदरमधून संजय जगताप आमदार आहेत. एकंदरीतच बारमती मतदार संघात काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समान प्रभाव आहे. अशात शरद पवार गटाचा एकही आमदार आता बारामती मतदार संघात नाही. शिवाय अजित पवार, भाजप आणि एकनाथ शिंदे यांची ताकद पाहता, बारामती शरद पवारांच्या हातून निघून गेल्यास नवल वाटणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now