“माझ्या बोटाला धरून राजकारणात आलेले, आता..”

On: April 30, 2024 5:18 PM
Sharad Pawar
---Advertisement---

Sharad Pawar | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल (29 एप्रिल) पुण्यात भव्य सभा झाली. याच सभेत मोदी यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली. त्यांनी शरद पवार यांचा उल्लेख ‘अतृप्त आत्मा’ असा केला होता. मोदींच्या या टीकेला आता स्वतः शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शरद पवार सध्या शिरूरच्या दौऱ्यावर आहेत. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार आले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेचा समाचार घेतला. जनतेच्या प्रश्नासाठी मी भटकतच राहील, असं उत्तर पवार (Sharad Pawar) यांनी दिलं आहे.

“माझ्या बोटाला धरून राजकारणात आलेले, आता..”

जनतेचा ज्यांच्यावर विश्वास आहे, त्यांना तुम्ही तुरुंगात टाकता. आता तुम्ही एक टक्का म्हणा की आणखी काही म्हणा. तुम्ही हुकूमशाहीच्या दिशेने जात आहात. माझ्या बोटाला धरून राजकारणात आलेले, आता माझ्याबद्दल काय बोलतात? एक आत्मा भटकत आहे असं तुम्ही म्हणाला. त्या आत्म्यापासून सुटका व्हायला हवी, असं मोदी म्हणाले. पण हा अस्वस्थ आत्मा स्वतःसाठी नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी आहे. यासाठी मी शंभरवेळा अस्वस्थता दाखवेन. हे संस्कार यशवंतराव चव्हाणांचे आहेत, त्यात आम्ही तडजोड करणार नाही, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत.

मोदी यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली होती. या टीकेचाही पवारांनी समाचार घेतला. “राहुलच्या तीन पिढ्या देशासाठी झटल्या आहेत. देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी झटल्या आहेत. त्यांचे वडील आणि आज्जींनी देशासाठी बलिदान दिलं. त्या राहुल गांधींना म्हणतात साहबजादे काय करणार? कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली, जनतेचे प्रश्न जाणून घेतले. पण याबाबत बोलण्याऐवजी मोदी काहीही बोलत आहेत. त्यामुळे अशा लोकांच्या हातातून सत्ता काढून घेणं गरजेचं आहे, असा संताप शरद पवार यांनी व्यक्त केलाय.

नरेंद्र मोदी काय म्हणाले होते?

आपल्याकडे म्हटलं जातं काही अतृप्त आत्मा असतात. त्यांची स्वप्नं पूर्ण झाली नाहीत की ते दुसऱ्यांच्या स्वप्नांमध्ये माती कालवतात. 45 वर्षांपूर्वी येथील एका बड्या नेत्याने आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली होती. तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरता आली. हा अतृप्त आत्मा 1995 मध्ये शिवसेना-भाजपचं सरकार अस्थिर करु पाहत होता. 2019 साली या अतृप्त आत्म्याने काय केलंय हे राज्याने पहिले आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केली होती.

दरम्यान, नरेंद्र मोदी आज माढामध्ये होते. आज सलग दुसऱ्या दिवशी देखील त्यांनी शरद पवारांवर टीका केली. “15 वर्षांपूर्वी माढामध्ये एक नेता निवडणूक लढण्यासाठी आला होता. त्यावेळचे लोक सांगतात की, या बड्या नेत्याने तेव्हा मावळत्या सूर्याच्या साक्षीने माढ्यातील दुष्काळी भागाला पाणी देण्याची शपथ घेतली होती. त्यांनी पाणी पोहचवलं आहे का? तर नाही. तुम्हाला हे लक्षात आहे ना? त्यांनी वचन दिलं होतं ते वचन त्यांनी पाळलं नाही. त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे.”, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. त्यामुळे राज्यात सध्या मोदी विरुद्ध शरद पवार असा संघर्ष पाहावयास मिळत आहे.

News Title :  Sharad Pawar Criticised Pm Narendra Modi After His Statement 

महत्त्वाच्या बातम्या-

‘…तर त्यांचे धंदे काढायला मला वेळ लागणार नाही’; तटकरेंचा गीतेंना इशारा

‘आमच्या कॉलरमध्ये दम, म्हणूनच शरद पवार…’; उदयनराजे थेट बोलले

मोदींच्या नेतृत्वात भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल- मुरलीधर मोहोळ

Samsung च्या ‘या’ लेटेस्ट स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट; किंमत ऐकून वेडे व्हाल

“गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय”; राऊतांचा मोदींवर पलटवार

Join WhatsApp Group

Join Now