Sharad Pawar | राज्याचंच नाहीतर देशाचं लक्ष हे शरद पवार (Sharad Pawar) यांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीकडे लागलं आहे. बारामतीमध्ये शरद पवार यांच्या गटातून सुप्रिया सुळे निवडणूक लढवणार आहे. तर त्यांच्याविरोधात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार गटाचा पराभव निश्चित आहे, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणालेत. ते कोल्हापूर येथे बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये बारामती लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. अजित पवार यांनी पक्षावर दावा सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंप्रमाणे चाल केली आहे. यावेळी निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष हा अजित पवार यांचा असल्याचा निर्णय दिला आहे. यामुळे अजित पवार हे आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बहिण सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर आता शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, बारामती लढतीबद्दल मला माहिती नाही, कारण विरोधकांनी उमेदवार जाहीर केला नाही, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?
शरद पवार हे कोल्हापूर येथे होते त्यावेळी त्यांना शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का? असा प्रश्न करण्यात आला होता. त्यावेळी ते उत्तरले, “आम्ही एकत्र काम करतो. त्यामुळे विलीनीकरण करणार नाही”, असं शरद पवार म्हणाले. काही दिवसांआधी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर शरद पवार यांनी स्पष्टोक्ती दिली आहे.
“अजित पवार गटाचा पराभव निश्चित”
“अजित पवार गटाचा पराभव हा निश्चित असल्याचा दावा केला आहे, ए. आर अंतुले मुख्यमंत्री होते, तेव्हा 59 पैकी 5 आमदार सोडून इतर सर्व आमदार सोडून गेले. यामुळे आमदार सोडून जाणं मला चिंता वाटण्यासारखी गोष्ट नाही. नंतरच्या निवडणुकीमध्ये 95 टक्के आमदार पराभूत झाले”, असं शरद पवार म्हणाले.
“सत्तेचा गैरवापर कसा करतात हे चंदीगडमध्ये दिसलं. सत्तेचा वापर कसा करतात हे दिसलं. पक्षाची स्थापन मी केली. आमच्याकडून पक्ष काढून नेलं, चिन्ह काढून नेलं अजूनही आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. निवडणुकीदरम्यान पक्षांतर कायद्याबाबत सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे”, असं शरद पवार म्हणाले.
News Title – Sharad Pawar Beat ajit pawar In upcoming Election
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय क्रिकेटमधील 2 दिग्गज ‘भाजप’त जाणार? लोकसभा लढण्याची शक्यता
विद्या बालनच्या अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची मुंबई पोलिसांत धाव, प्रकरण काय?
विराट-अनुष्काच्या लेकाचे नाव ‘अकाय’, जाणून घ्या याचा अर्थ
राहुल गांधी यांचं ऐश्वर्या रायबद्दल विधान अन् चाहते संतापले!
दीपिका आणि रणवीर सिंह यांच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर, लवकरच…






