शरद पवारांनी उपसलं हुमकी अस्त्र, अजित पवारांचं आता काय होणार?

On: November 9, 2023 7:45 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कुणाची?, शरद पवार यांची की अजित पवार यांची???, शिवसेना कुणाची या वादानंतर सुरु झालेला हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचला आहे आणि याच वादावर आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी शरद पवार गटाने मोठा दावा करत अजित पवार गटावर गंभीर आरोप केले आहेत.

अजित पवार गटाने आयोगासमोर दाखल केलेली शपथपत्रं ही बोगस असल्याचा खळबळजनक दावा शरद पवार गटाने केला आहे. अजित पवार गटासाठी धक्कादायक बाब म्हणजे शरद पवार यांनी थेट कायदेशीर कारवाईचं अस्त्र उपसलं आहे. अजित पवार गटावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगासमोर शरद पवार गटाची बाजू मांडणारे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केली आहे.

शरद पवार गटाचा धक्कादायक दावा-

अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, “आम्ही आजच्या सुनावणीवेळी अनेक धक्कादायक गोष्टी आयोगासमोर मांडल्या आहेत. जे दस्तावेज याचिकाकर्त्यांनी निवडणूक आयोगासमोर दाखल केलेत, जवळपास २० हजार प्रतिज्ञापत्रं ही आम्ही स्वतः तपासली आहेत. त्यातील तब्बल ८९०० प्रतिज्ञापत्रं ही बोगस असल्याचं आम्ही आयोगाला सांगितलं आहे. काही व्यक्ती तर मृत आहेत, त्यांचीही प्रतिज्ञापत्रं दाखल करण्यात आली आहेत, तसेच काही अल्पवयीन लोकांची प्रतिज्ञापत्रंही दिली आहेत, काही अशी पदं आहेत जी राष्ट्रवादी पक्षाच्या संविधानात समाविष्ट नाहीत.”

ते पुढे म्हणाले की, “काही कागदपत्रात केवळ हाऊसवाईफ, झॉमेटो सेल्समन असं म्हणून सह्या केलेल्या आहेत. त्याचसोबत आम्ही २४ कॅटेगिरी बनवल्या असून त्यात अजित पवार गटाने दाखल केलेली प्रतिज्ञापत्रे बोगस आहेत, बोगसरित्या तयार केलेली आहेत. केवळ खोट्या गोष्टीचे समर्थन करण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला आहे. हे प्रकरण इतकं गंभीर आहे की, अजित पवार गटाविरोधात कायदेशीर कारवाई करावी.”

दरम्यान, खोटी कागदपत्रे, खोटे जबाब नोंदवण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात यावा, ही मागणी केल्याने शरद पवार गटाने कायदेशीर कारवाईचं शस्त्र उपसल्याचं दिसतं. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० तारखेला होणार असून या प्रकरणात सत्याचा विजय होईल, असा विश्वास शरद पवार गटाने व्यक्त केला आहे, मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावरच निवडणूक आयोग या प्रकरणी निर्णय देईल.

महत्त्वाच्या बातम्या- 

भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यासाठी मोठा बदल, ‘या’ मॅचविनर खेळाडूची संघात एन्ट्री!

‘हा’ माजी मंत्री अडचणीत; राजकारणात खळबळ

येत्या 24 तासांत ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस 

पाडव्याला गोविंद बागेत जाणार?; अजित पवारांनी स्वत:च सांगितलं 

पोलीस दलात खळबळ!, फिल्मी स्टाईल घटनेची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now