2025 मध्ये ‘या’ राशींना साडेसातीचा प्रभाव, तर ‘या’ राशीची होणार सुटका!

On: January 22, 2025 4:21 PM
Shani Transit
---Advertisement---

Shani Sade Sati 2025  | ज्योतिषशास्त्रात (Jyotish Shastra) शनि (Shani) हा अत्यंत प्रभावी ग्रह मानला जातो आणि तो न्यायाचे प्रतीक मानला जातो. शनि हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह असून, एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला अडीच वर्षे लागतात. शनीच्या (Shani) संक्रमणाचा (Transit) व्यक्तीच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. २०२५ मध्ये शनि (Shani) मीन राशीत (Pisces) प्रवेश करणार असून, त्याचा काही राशींवर (Shani Sade Sati 2025) सकारात्मक (Positive) तर काहींवर नकारात्मक (Negative) प्रभाव पडेल.

शनीची (Shani) साडेसाती (Sadesati) आणि तिचे टप्पे

जेव्हा कुंडलीच्या (Horoscope) बाराव्या स्थानात शनिचे (Shani) गोचर (Transit) होते, तेव्हा शनीच्या साडेसातीचा (Sadesati) प्रभाव सुरू होतो, असे ज्योतिषशास्त्रात (Astrology) मानले जाते. साडेसातीचे तीन टप्पे असतात, प्रत्येक टप्पा अडीच वर्षांचा असतो.

पहिला टप्पा: मानसिक ताणतणाव (Mental Stress)
दुसरा टप्पा: आर्थिक नुकसान (Financial Loss), आरोग्य समस्या (Health Issues), मित्रांकडून विश्वासघात (Betrayal)
तिसरा टप्पा: नुकसानाची भरपाई आणि लाभ
सध्या कुंभ राशीत (Aquarius) असलेला शनि (Shani) २९ मार्च २०२५ रोजी मीन राशीत (Pisces) प्रवेश करेल.

या राशींवर (Zodiac Signs) होणार परिणाम:

मीन रास (Pisces): सध्या मीन राशीवर (Pisces) साडेसातीचा (Sadesati) पहिला टप्पा सुरू असून, २९ मार्च २०२५ पासून दुसरा टप्पा सुरू होईल. या काळात मीन राशीच्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः आरोग्य, आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक जीवनात आव्हाने येतील.

मेष रास (Aries): शनिच्या (Shani) मीन राशीतील (Pisces) प्रवेशामुळे मेष राशीची (Aries) साडेसाती (Sadesati) सुरू होईल. हा साडेसातीचा पहिला टप्पा असेल. (Shani Sade Sati 2025)

कुंभ रास (Aquarius): कुंभ राशीवर (Aquarius) साडेसातीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा सुरू होईल. या काळात त्यांना आधीच्या टप्प्यात झालेल्या नुकसानाची भरपाई होईल आणि लाभ मिळतील.

मकर रास (Capricorn): शनिच्या (Shani) मीन राशीतील (Pisces) प्रवेशामुळे मकर राशीची (Capricorn) साडेसाती संपुष्टात येईल.

मीन राशीच्या (Pisces) व्यक्तींनी शनीच्या साडेसातीचा (Sadesati) प्रभाव कमी करण्यासाठी खालील उपाय करावेत:

मानसिकदृष्ट्या खंबीर राहा.
तामसिक आहार टाळा.
नोकरांशी चांगले वागा.
गरजूंना मदत करा.
शनिवारी गरजूंना काळ्या रंगाचे जोडे किंवा चप्पल दान करा.
एका वाडग्यात मोहरीचे तेल घेऊन त्यात एक नाणे टाका आणि त्यात आपला चेहरा पहा. नंतर शनि मंत्राचा जप करा.
शनिवारी माकडांना चणे खाऊ घाला.
सुंदरकांड आणि हनुमान चालिसाचे पठण करा. (Shani Sade Sati 2025)

Title : Shani Sade Sati 2025 These Zodiac Signs Will Face Sade Sati While Others Will Get Relief

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now