अजित पवारांबाबत शालिनीताई पाटलांनी केलेल्या दाव्याने राजकारणात खळबळ!

On: May 4, 2023 12:31 PM
---Advertisement---

मुंबई | शरद पवार माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहेत. मी अजूनही आपला कामकाज संभाळते त्यामुळे पवारांनी एवढ्या लवकर निवृत्ती घ्यायला नको होती, असं माजी आमदार शालिनीताई पाटील (Shalini Patil) यांनी म्हटलंय.

अजित पवार (Ajit Pawar) घोटाळेबाज आणि गुन्ह्यांखाली अडकलेले नेते आहेत. त्यांना कधीही अटक होऊ शकते म्हणून त्यांना अध्यक्षपद देणं चुकीचं ठरेल, अशी घणाघाती टीकाही शालिनीताई पाटील यांनी केली आहे.

जर पुढचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष ठरवायचा असेल तर सुप्रिया सुळे यांनाच बनवावं. कारण ती याच्यासाठी सक्षम आहे. अजित पवार हे घोटाळेबाज आणि गुन्ह्याखाली अडकलेले नेते आहेत. त्यांना कधीही अटक होऊ शकते म्हणून त्यांना अध्यक्षपद देणं हे चुकीचं ठरेल,, असं शालिनी पाटील यांनी म्हटलंय.

अजितदादांच्या पाठीशी भाजपच्या मोठ्या नेत्याचा हात आहे, म्हणूनच ईडीकडून अद्याप एकदाही अजितदादांची चौकशी झाली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now