शक्तीपीठ महामार्गाला वाढता विरोध, विशाल पाटलांचा थेट सरकारला इशारा

On: January 18, 2025 11:26 AM
Shaktipeeth Expressway
---Advertisement---

Shaktipeeth Expressway l कोल्हापूरला (Kolhapur) वगळल्यानंतर आता सांगली (Sangli) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला आहे. “शक्तीपीठ महामार्गातून ज्या पद्धतीने कोल्हापूर वगळलं, त्याच पद्धतीने सांगली जिल्ह्यालाही वगळावं. सरकारला ही शेवटची विनंती, अन्यथा आंदोलन (Agitation) करावे लागेल,” असा इशारा खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी सरकारला दिला आहे.

शक्तीपीठ महामार्गाला विरोध का? :

“आम्ही शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत नाही. शक्तीपीठाला रत्नागिरी-नागपूर (Ratnagiri-Nagpur) हा पर्यायी रस्ता (Alternative Route) आहे. याच रस्त्याला शक्तीपीठे जोडावीत. ज्या भागात शेतकरी जमिनी द्यायला तयार आहेत, त्या ठिकाणच्या जमिनी घ्याव्यात. तासगाव (Tasgaon), मिरज (Miraj) या तालुक्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गास विरोध आहे. नियोजित शक्तीपीठ महामार्ग हा खरोखरच शक्तीपीठांना जोडणारा रस्ता आहे की दुसऱ्या हेतूने (Motive) निर्माण केलेला रस्ता आहे? कमी खर्चात जमीन अधिग्रहण (Land Acquisition) करून त्यासाठी जास्त खर्च करण्यासाठी हा प्रकल्प (Project) आहे, अशी शंका येते,” असे विशाल पाटील म्हणाले.

Shaktipeeth Expressway l शेतकऱ्यांची भूमिका :

“वास्तविक पाहता शक्तीपीठ महामार्गास जमिनी देण्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता (Mentality) नाही. नदीकाठच्या (Riverside) बागायती (Irrigated) जमिनी आहेत. शेतकऱ्यांनी कष्ट करून ऊस बागा (Sugarcane Farms) पिकवल्या आहेत. शासनाकडून (Government) जिरायत (Rainfed) नोंद झाली आहे. त्यामुळे मूल्यांकनही (Valuation) कमी होते, परिणामी नुकसान भरपाई (Compensation) कमी मिळते. जिरायतीची नोंद बागायत केली तर नुकसान भरपाई दुप्पट मिळेल, तर तुम्ही जमिनी देण्यास तयार आहात का?” अशी विचारणा शेतकऱ्यांशी केली असता, त्यांनी जमिनी देण्यास नकार (Refusal) दिला, असे विशाल पाटील यांनी सांगितले.

शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर, सांगली पाठोपाठ आता हिंगोली जिल्ह्यातूनही विरोध होत आहे. या महामार्गासाठी महाराष्ट्रातील (Maharashtra) बारा जिल्ह्यांतून (Districts) २७ हजार हेक्टर (Hectares) शेत जमिनीचे अधिग्रहण केले जाणार आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील शेत जमिनीचाही समावेश असल्याने, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध दर्शवला आहे. “आमच्याकडे असलेल्या बागायती शेत जमिनीच्या भरवशावर आमचा उदरनिर्वाह (Livelihood) होत असतो. जर त्या शेतीमधून महामार्ग नेला तर आमच्यावर उपासमारीची (Starvation) वेळ येईल. त्यामुळे या महामार्गाला विरोध आहे. सरकारने कितीही मोबदला (Compensation) दिला तरीही आम्ही आमच्या जमिनी शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही,” अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

हा महामार्ग कोल्हापूर (Kolhapur) – अंबाबाई (Ambabai), तुळजापूर (Tuljapur) – तुळजाभवानी (Tuljabhavani), नांदेड (Nanded) – माहूरची रेणुका देवी (Mahur Renuka Devi) या तीन शक्तिपीठांना जोडणार आहे. तसेच परळी वैजनाथ (Parli Vaijnath), हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ (Aundha Nagnath), माहूरची रेणुकादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपूरचे विठ्ठल रखुमाई मंदिर (Pandharpur Vitthal Rukhumai Temple), कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर (Kolhapur Mahalaxmi Temple), सोलापुरातील सिद्धरामेश्वर (Solapur Siddharameshwar), अक्कलकोट (Akkalkot), गाणगापूर (Ganagapur), कारंजा लाड (Karanja Lad), नृसिंहवाडी (Nrusinhawadi), औदुंबर (Audumbar) या बारा देवस्थानांना जोडणार आहे.

Title : Shaktipeeth Expressway: Growing opposition from farmers in Sangli and Hingoli

महत्वाच्या बातम्या- 

महाकुंभमधील 95 वर्षीय अघोरी बाबाची धक्कादायक भविष्यवाणी, म्हणाले ‘येणारा काळ हा’

कसं असेल आजचं हवामान?, IMD ने दिली महत्त्वाची अपडेट

इंटरनेटवर टाइमपास करणाऱ्यांची आकडेवारी समोर, बघून तुम्हालाही धक्का बसेल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणूक आणण्यासाठी दावोस दौऱ्यावर जाणार!

जेल की बेल?, वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

 

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now