Shahrukh On Virat Kohli | बॉलिवूडचा किंग खान अर्थातच अभिनेता शाहरूख खान (Shahrukh On Virat Kohli) टीम इंडियाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर विराट कोहलीला बॉलिवूडचा जावई म्हणालाय. विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा ही अनेक कारणाने चर्चेत असते. शाहरूखने अनुष्कासोबत काम केलं आहे. अनुष्काने रबने बना दी जोडी या चित्रपटातून पदर्पण केलं आहे. त्यानंतर तिनं शाहरूखसोबत जब तक है जान आणि झिरो या चित्रपटात काम केलं. (Shahrukh On Virat Kohli)
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शाहरूख अनुष्काचा पती विराट कोहलीबाबत व्यक्त झाला आहे. विराटसोबत मी बराच वेळ घालवला आहे. तो अनुष्काला सतत भेटायला यायचा. जेव्हा अनुष्का आणि विराट एकमेकांना डेट करत होते तेव्हापासून शाहरूख विराटला चांगलं ओळखतो.
“त्याला आम्ही बॉलिवूडचा जावई म्हणतो”
स्टार स्पोर्ट्सशी बोलत असताना शाहरूखने सांगितलं, “मी त्याच्यासोबत बराच वेळ घालवला आहे. मला तो खूप आवडतो. त्याला आम्ही बॉलिवूडचा जावई म्हणतो. इतर खेळाडूंपैकी मी विराटला सर्वाधिक ओळखतो. मी विराट आणि अनुष्काला बऱ्याच वर्षांपासून ओळखतो आणि त्यांच्यासोबत बराच वेळ घालवला आहे. जेव्हापासून विराट अनुष्काला डेट करत होता, तेव्हापासून मी त्याला ओळखतो. अनुष्का सेटवर शूटींग करत असायची. तेव्हा तो तिला भेटायला यायचा आणि तेव्हापासून आमची ओळख झाली.”
शाहरूख आणि विराटचा डान्स स्टेप्स व्हिडीओ व्हायरल
गेल्या वर्षी आयपीएलदरम्यान शाहरूख खान आणि विराट कोहलीने एकत्र डान्स केला होता. ‘झुमे जो पठान’ या गाण्याची ‘हुक स्टेप’ दोघांनी केली होती. तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओची आजही चर्चा आहे. या व्हिडीओमागील छोटी स्टोरी शाहरूखने सांगितली.
विराट आणि रवींद्र जडेजा ही स्टेप्स करत होते. मात्र त्या दोघांना ही स्टेप्स करता आली नाही. त्यामुळे त्यांना ती स्टेप्स शिकवण्याचा मी प्रयत्न केला, असं शाहरूख खान म्हणाला. तेव्हा ती स्टेप्स शिकवत असताना विराटने ती स्टेप्स केली आणि व्हिडीओ व्हायरल झाला.
शाहरूख हा आयपीएलमध्ये कोलकता नाईट रायडर्स संघाचा मालक आहे. याआधीच्या आयपीएलमध्ये तो एका वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. याचा परिणाम त्याच्या संघावर झालेला पाहायला मिळाला होता. मात्र त्यानंतर तो आयपीएलमध्ये नेहमी सकारात्मक गोष्टींना घेऊन चर्चेत असलेला दिसतो. इतर संघांच्या खेळाडूंचा तो नेहमी आदर करताना दिसतो.
News Title – Shahrukh On Virat Kohli Statement
महत्त्वाच्या बातम्या
महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना दिलासा; सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण
“मी जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना..”; पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य
पीएफ खात्यात पैसे जमा झाले की नाही?, कसं तपासणार?; जाणून घ्या सविस्तर
‘या’ भागांत सूर्य आग ओकणार! हवामान विभागाकडून उष्णतेचा यलो अलर्ट
‘या’ राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार, नव्या संधी आयुष्य बदलतील






