शाहरुख खानच्या कृत्याने वाद! किंग खान स्टेडियममध्ये ‘हे’ करताना दिसला!

On: March 24, 2024 11:06 AM
Shah Rukh Khan
---Advertisement---

ShahRukh Khan | आयपीएल 2024 च्या आपल्या पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला. कोलकाता नाइट रायडर्सने (KKR vs SRH) त्यांच्या घरच्या मैदानावर ईडन गार्डन्सवर जबरदस्त फलंदाजीचा देखावा सादर केला. संघाचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलने तो फॉर्म दाखवला ज्यासाठी तो नेहमीच ओळखला जातो. रसेलने स्फोटक खेळी करत षटकारांचा वर्षाव केला. रसेलसह कोलकात्याच्या उर्वरित फलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीने संघाला विजयी सलामी देता आली. (ShahRukh Khan IPL)

केकेआरच्या खेळाडूंनी संघ मालक आणि बॉलिवूड स्टार शाहरुख खानचेही मन जिंकले. पण या सगळ्यात शाहरुखने असे काही केले ज्यामुळे खळबळ उडाली आहे. आयपीएलच्या नव्या मोसमातील कोलकात्याच्या पहिल्या सामन्यात संघाला पाठिंबा देण्यासाठी शाहरुख खानही उपस्थित होता.

किंग खान पुन्हा एकदा वादात

यावेळी शाहरुखची झलक पाहून चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आणि त्याच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली. असे असताना शाहरुखनेही त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आणि हस्तांदोलन करत फ्लाइंग किस दिला. यावेळी शाहरुखने संघाच्या फलंदाजीचाही आनंद लुटला. मात्र यादरम्यान तो अचानक सिगारेटचा धूर उडवताना कॅमेऱ्यात कैद झाला.

स्मोकिंगच्या सवयीमुळे नेहमीच चर्चेत राहणारा शाहरुख खान ईडन गार्डन्स स्टेडियमवरही स्वत:ला असे करण्यापासून रोखू शकला नाही. कोलकात्याच्या डावादरम्यान शाहरुख स्टेडियमच्या कॉर्पोरेट बॉक्समध्ये बसून सामन्याचा आनंद लुटत होता आणि यादरम्यान तो सिगारेट ओढताना कॅमेऱ्याच्या नजरेत आला.

ShahRukh Khan चे फोटो व्हायरल

शाहरुखचा स्मोकिंगचा व्हिडीओ टीव्ही स्क्रीनवर येताच त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. अनेक युजर्संनी यावर शाहरुखची निंदा करत हा तरुणांसाठी चुकीचा संदेश असल्याचे म्हटले आहे. खरं तर शाहरुखचा आयपीएलमधील वादांशी मोठ्या कालावधीपासून संबंध राहिला आहे.

 

आयपीएल सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये असे करताना पकडले जाण्याची ही त्याची पहिलीच वेळ नाही. याआधी 2012 च्या मोसमातही तो स्टेडियममध्ये सिगारेट ओढताना दिसला होता. त्यानंतर शाहरुख जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये सिगारेट ओढताना दिसला. या प्रकरणी जयपूरच्या स्थानिक न्यायालयात त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. याशिवाय मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ग्राउंड स्टाफशी झालेल्या भांडणामुळे त्याला अनेक वर्ष स्टेडियममध्ये येण्यास बंदी घालण्यात आली होती.

News Title- kkr vs srh ipl 2024 match Shah Rukh Khan was spotted smoking in ipl match
महत्त्वाच्या बातम्या –

KKR साठी हिरो ठरला पण चूक ‘लय’ भोवली; युवा खेळाडूवर मोठी कारवाई!

IPL ची फायनल कुठे? ‘करा किंवा मरा’च्या लढतींचे ठिकाण ठरले, मुंबईत सामना नाही

पराभवानंतर ऋषभ पंतने वाचला चुकांचा पाढा, सांगितलं पराभवाचं कारण

“उदयनराजे इकडे तिकडे फिरताहेत…”; बिचुकलेचं मोठं वक्तव्य

‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकलेची सर्वात मोठी घोषणा!

Join WhatsApp Group

Join Now