“शाहरूख खान मुस्लिम नाही त्याला गोळी घाला”

On: January 28, 2023 5:48 PM
---Advertisement---

मुंबई | बाॅलिवूड(Bollywood) अभिनेता शाहरूख खान(Shah Rukh Khan) त्याच्या ‘पठाण'(Pathaan) या चित्रपटामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील ‘बेशरम’ हे गाणं जेव्हापासून रिलीज झालं आहे, तेव्हापासून या चित्रपटाला विरोध केला जात आहे.

हा चित्रपट 25 जानेवारीला रिलीज झाला आहे. चित्रपटगृहात ‘पठाण’ चित्रपट पाहण्यास मोठी गर्दी दिसत आहे. परंतु तरीही अनेकांचा चित्रपटाला विरोध सुरूच आहे. त्यामुळं शाहरूखलाही अनेकांनी धारेवर धरलं आहे.

हे सगळं सुरू असतानाच मुंबईच्या रझा अकादमीच्या मौलवींनी शाहरूखबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शाहरूख खान मुस्लिम नाही जावा आणि त्याला मारून टाका, असं वक्तव्य मौलवींनी केलं आहे.

बजरंग दल आणि हिंदू परिषदेला जर पठाण चित्रपटाला विरोध करायचा असेल तर त्यांनी शाहरूखच्या घरी जावं आणि त्याला गोळी घालावी, असंही मौलवी म्हणाले आहेत.

शाहरूखला जे काही बोलायचंय ते बोला, त्याच्यासोबत काय करायचंय ते करा पण प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह बाललेलं सहन केलं जाणार नाही, अशा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, इंदूरमधील बजरंग दलानं पठाण चित्रपटाला विरोध केला होता. त्यावेळी काहींनी प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी केली होती.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now