Vinod Tawade | भाजपचे राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे (Vinod Tawade) यांना पैसे वाटताना रंगेहात पकडल्याचा दावा बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच विनोद तावडे हे पाच कोटी रुपये वाटप करण्यासाठी आल्याची माहिती दस्तूरखुद्द भाजपमधूनच देण्यात आल्याचा गौप्यस्फोट ठाकुर यांनी केला आहे.
हितेंद्र ठाकुरांचा गौप्यस्फोट
भाजपामधील एका मित्राने ही माहिती दिल्याची माहिती ठाकुर यांनी दिली. यावरून आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. तर हे प्रकरण इथेच थांबवण्याची विनंती तावडेंनी केल्याची माहिती हितेंद्र ठाकुर यांनी दिली. त्यावर तावडे यांनी चौकशी करण्याची प्रतिक्रिया दिली आहे.
विनोद तावडे, क्षितिज ठाकुर आणि हितेंद्र ठाकुर यांची एक संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी हितेंद्र ठाकुर यांनी त्यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप केला. तर ठाकुर यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आवाहन तावडे यांनी केली.
तावडेंचं नेतृत्व संपवण्याचा डाव- संजय राऊत
विनोद तावडे हे बहुजन नेतृत्व आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळेच त्यांचा भाजपमधून गेम करण्यात आल्याचा, त्यांचे नेतृत्व संपवण्याचा डाव असल्याची प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली.
“भाजपने कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी नालासोपारा विरारमध्ये जे घडलं ते कॅमेऱ्यासमोर आहे. खुलासे कसले करता. भाजपचा खरा चेहरा उघड झाला, त्यांचा निवडणुकीतील खेळ संपला. विनोद तावडे हे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आहे. पक्षाच्या राष्ट्रीय महासचिवाकडे पाच कोटी रुपये पकडण्यात आले. बहुजन विकास आघाडीचे लोकं घुसले. त्यांनी पैसे जप्त केले. पैसे फेकले तोंडावर. त्यांनी तावडेंना कोंडून ठेवलं. यावर भाजप काय खुलासा करणार आहे”, असे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
खळबळजनक! विनोद तावडेंना जिथे पकडलं, त्याच हाॅटेलच्या एका खोलीत 7 महिला…
उद्धव ठाकरे तावडेंवर कडाडले, म्हणाले या खोकासुरांना…
“माझ्यावरती अन्याय झाला…”, तेजस्विनी पंडीतकडून राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ शेअर






