उद्धव ठाकरे तावडेंवर कडाडले, म्हणाले या खोकासुरांना…

On: November 19, 2024 5:24 PM
Uddhav Thackery
---Advertisement---

Uddhav Thackeray  l भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमधील एका हॉटेलात पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी पक्षाने केला आहे. विनोद तावडे हे विरारमधील एका हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते, असा दावा बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. अशातच आता याप्रकरणावर उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे.

Uddhav Thackeray l हायहोल्टेज ड्राम्यामळे राजकीय नेतेमंडळी थक्क :

विरारमध्ये झालेल्या या ड्राम्याने लोकशाहीची लक्तरं वेशीवर टांगल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. यावेळी विरार पूर्वेतील मनवेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र या कार्यकर्त्यांना तावडे यांनी तब्बल चार तास घेराव घातला. त्यामुळे आता या हायहोल्टेज ड्राम्यामळे राजकीय नेतेमंडळी आवाक झाले आहेत.

अशातच आता राज्यातील प्रत्येक पक्षातून या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देखील येत आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील त्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील खोकासुरांची आणि भ्रष्टासुराची राजवट संपून महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेशी अशी राजवट येऊ दे असं आपण आई तुळजाभवानीला साकडं घातलं आहे. तसेच आई आमच्या पाठीशी आहे असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

News Title – Uddhav Thackery attack on Vinod Tawade

महत्त्वाच्या बातम्या-

“माझ्यावरती अन्याय झाला…”, तेजस्विनी पंडीतकडून राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ शेअर

पैसे वाटप प्रकरणी विनोद तावडेंवर मोठी कारवाई, अडचणी वाढल्या

मनोज जरांगेंचं मराठा समाजाला महत्वाचं आवाहन, म्हणाले…

विनोद तावडेंच्या डायरीत नेमकं काय लिहिलं?; हितेंद्र ठाकूरांच्या खुलाशाने खळबळ

एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला दिलं मोठं आश्वासन!

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now