सर्वात मोठी बातमी! भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; ‘या’ दिग्गजांना संधी

On: March 13, 2024 7:56 PM
BJP Yuva Morcha
---Advertisement---

BJP candidate list | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या दिग्गजांचा समावेश आहे. नागपूरमधून नितीन गडकरी, बीडहून पंकजा मुंडे तर पुण्याहून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रक्षा खडसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. नितीन गडकरी यांना नागपूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांना संधी देण्यात आली आहे. रक्षा खडसे यांच्या उमदेवारीबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. रक्षा खडसे या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या सून आहेत.

भाजपने महाराष्ट्रातील दिग्गजांची नावं जाहीर केली असली तरी अनेक दिग्गजांनी नावं कापली आहेत. यामध्ये प्रामुख्याने भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांचं नाव आहे. गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य पियुष गोयल (Piyush Goyal) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

BJP candidate list | महाराष्ट्रातले भाजप उमेदवार

नंदुरबार- हीना गावित
धुळे- सुभाष भामरे
जळगाव- स्मिता वाघ
रावेर- रक्षा खडसे
अकोला- अनूप धोत्रे
वर्धा- रामदास तडस
नागपूर- नितीन गडकरी
चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
नांदेड- प्रतापराव पाटील चिखलीकर
जालना- रावसाहेब दानवे
डिंडोरी- भारती पवार
भिवंडी- कपिल पाटील
मुंबई उत्तर- पियुष गोयल
मुंबई उत्तर पूर्व- मिहिर कोटेचा
पुणे- मुरलीधर मोहोळ
अहमदनगर- सुजय विखे पाटील
बीड- पंकजा मुंडे
लातूर- सुधाकर श्रुंगारे
माढा- रणजितसिंह नाईक निंबाळकर
सांगली- संजयकाका पाटील

महत्त्वाच्या बातम्या- 

मंत्रालयातून मोठी बातमी, मुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी बदलली!

‘या’ गोष्टींसाठी पतीला कधीच नाही म्हणू नका, अन्यथा…

बारामतीच्या आखाड्यात बच्चू कडूंची एन्ट्री, अजित पवार-सुप्रिया सुळेंना धक्का!

“देवाची शपथ घेऊन सांगतो, अजित पवार बारामती हरणार”, महायुतीच्याच नेत्याचं भाकीत

मोठी बातमी! पुण्यातील ‘या’ तालुक्याचं नाव बदललं

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now