Weather Change l नीरा (Nira) परिसरात, गेल्या काही दिवसांपासून तापमानात (Temperature) चढ-उतार होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात (Maharashtra) तापमान वाढत असताना, रात्री आणि पहाटे हवेत गारवा जाणवत आहे. महाशिवरात्रीपूर्वीच (Mahashivratri) दिवसभर उन्हाचे चटके, तर रात्रीचा गारवा, अशा विचित्र वातावरणामुळे लहान मुलांसह वृद्धांमध्ये ताप, खोकला, सर्दीचे प्रमाण वाढले आहे.
तापमानात वाढ :
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच सूर्य तापत असून, दुपारी घाम फुटत आहे. महाशिवरात्रीनंतर पुढील आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाचे चटके आणखी तीव्र होणार आहेत.
Weather Change l आजारांमध्ये वाढ :
दिवसा चटके लागत असले तरी, रात्रीचा गारवा मात्र कायम आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे डॉ. रोहन लकडे (Dr. Rohan Lakde) यांनी सांगितले. हवामान विभागाच्या (IMD) निरीक्षणानुसार, मराठवाड्यात (Marathwada) आकाश स्वच्छ असून वातावरण कोरडे आहे. सकाळपासून सूर्याचे तापमान अधिक होत आहे. फेब्रुवारीच्या शेवटी व मार्चच्या पहिल्या आठवड्यात तापमान त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्याची चाहूल :
राज्याच्या प्रत्येक भागात वेगवेगळे हवामान आहे. पण आता फेब्रुवारी महिना मध्यावर आल्याने तापमानाच्या पाऱ्यात हळूहळू वाढ होण्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी उन्हाचा तडाखा अधिक तीव्रतेने जाणवू शकतो. मागील आठवड्यापासून सर्वत्र दिवसाचा पारा वाढला असून, सरासरीपेक्षा तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
एप्रिल-मे महिन्यात सूर्य आग ओकणार :
यंदा फेब्रुवारीत सूर्य तापत असल्याने उन्हाळ्यातील मार्च, एप्रिल, मे महिन्यांत सूर्य आग ओकणार असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उन्हा सोबतच नागरिकांना पाणीटंचाईचे चटके बसणार आहेत, यात शंका नाही. त्यामुळे प्रशासनाने पाणीटंचाई निवारणासाठी आतापासूनच तयारी करणे गरजेचे आहे.
डॉक्टरांचा सल्ला :
“आता उन्हाळ्याची चाहूल लागली असून, कडक ऊन पडत आहे. अचानक ऊन तापल्याने व रात्रीचा गारवा कायम राहिल्याने लहान मुले, वयोवृद्ध नागरिक आजारी पडत आहेत. त्यामुळे आजारी व्यक्तींनी अंगावर दुखणे काढू नये, स्वतः गोळ्या-औषध न घेता जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधोपचार करून घ्यावे.”






