पुण्यात धडकी भरवणारा अपघात, पाहा व्हिडीओ

On: November 21, 2023 2:34 PM
---Advertisement---

पुणे | पुण्यात धडकी भरवणारा अपघात घडला आहे. भरधाव असणाऱ्या टेम्पोने पाच दुचाकी आणि एका चार चाकी वाहनांना धडक दिली. या अपघातात सात जण जखमी झाले आहेत. टेम्पो चालक गोविंद भालचंद्र लाल याच्यावर पौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या अपघातात (Tempo Accident) टेम्पोने 6 वाहनांना धडक दिली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे त्याने एकामागं एक असं अनेक वाहनांना उडवलं. या अपघातात प्रवासी आणि रस्त्यावरून जाणारी काही माणसं गंभीर जखमी झालेत तर काही जणांची प्रकृती गंभीर आहे.

जखमीमध्ये एका डॉक्टरचा समावेश असून गंभीर अवस्थेत त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवलं आहे. उर्वरित सहा जखमींना पिरंगुट तसेच लवळे फाटा येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.

पिरंगुट घाटात अपघाताची मालिकेमुळे अनेक जणांचे प्राण गेले आहेत. शेकडो प्रवासी जायबंदी झाले आहेत. त्यामुळे मुळशीतील नागरिक आक्रमक झाले आहे. त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने या ठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी केलीये.

पाहा व्हिडीओ

 

 

महत्त्वाच्या बातम्या- 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा झटका! 

मोठा गौप्यस्फोट: ललित पाटील प्रकरणात ‘या’ बड्या नेत्यांची नावं 

मराठा आरक्षण कोणी लपवून ठेवलं?, जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 

भंडाऱ्यात अजित पवार यांच्या कार्यक्रमावेळी घडला धक्कादायक प्रकार

विश्वचषक सामन्याआधीच अभिनेत्री उर्वशी रौतेला म्हणाली…

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now