अभिनेते सयाजी शिंदे रुग्णालयात, प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट

On: April 12, 2024 9:44 PM
Maratha Reservation
---Advertisement---

Sayaji Shinde Health | अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रकृतीबाबत (Sayaji Shinde Health) मोठी माहिती समोर आली आहे. सयाजी शिंदे यांच्या छातीमध्ये दुखत असल्याने त्यांना 11 एप्रिल रोजी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. (Sayaji Shinde Health)

साताऱ्यातील प्रतिभा रूग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. माध्यमांशी बोलत असताना सयाजी शिंदे यांच्या डॉक्टरांनी मोठी अपडेट दिलीये. मागील आठवड्यामध्ये सयाजी शिंदे यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळे त्यांनी रूटीन चाचण्या केल्या. त्यातून हृदयाची हालचाल कमी होत असल्याचं जाणवलं. हे पाहता त्यांच्या अँजिओग्राफी करण्यात आली. त्यातील 3 पैकी 1 रक्तवाहिन्यामध्ये 99 टक्के ब्लॉक आढळला.

सयाजी शिंदे यांना लवकरच डिस्चार्ज

सयाजी शिंदे यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती पाहता दोन दिवसांमध्येच त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. सयाजी शिंदे यांच्या चाहत्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करायला सुरूवात केली आहे. (Sayaji Shinde Health)

मराठीसह बॉलिवूड आणि टॅलिवूडसह इतर भाषेत केलंय काम

सयाजी शिंदे यांनी मराठीसह बॉलिवूड आणि टॅलिवूडसह इतर भाषेत काम केलं आहे. त्यांचे अनेक चित्रपट हे सुपरहिट ठरले असून दक्षिणात्य भाषेतच ते चित्रपट करत नाहीत तर कन्नड, तेलगू, मल्याळम आणि तमिळ चित्रपटामध्ये देखील त्यांनी काम केलंय. आटपाटची निर्मिती असलेल्या घर बंदुक बिर्याणी चित्रपटामध्ये देखील त्यांनी चांगली भूमिका केलीये. (Sayaji Shinde Health)

तसेच अभिनया व्यतिरिक्त त्यांनी गोष्ट छोटी डोंगराएवढी या चित्रपटाची निर्मिती केलीये. तर त्यांचा सहयाद्री देवराई नावाचा प्रकल्प देखील आहे. ते नेहमी झाडांप्रती, निसर्गाप्रती संवेदनशील भूमिका घेतात.

News Title – Sayaji Shinde Health Update

महत्त्वाच्या बातम्या

आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स हे संघ भिडणार; कोण बाजी मारणार?

सिनेसृष्टीत शोककळा! साखरपुड्याच्या दिवशी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

RCB कोमात MI जोमात; बुमराह, इशान आणि सूर्यकुमार यांनी दाखवली आपली जादू

ह्युंदाई कंपनीने ग्राहकांना दिली आनंदाची बातमी; जबरदस्त मॉडेलसह नवीन व्हेरियंट लाँच

या राशीच्या व्यक्तींना शेअर मार्केटमध्ये यश मिळेल

Join WhatsApp Group

Join Now