“नरेंद्र मोदी हा तर स्वामी विवेकानंदांचा पुनर्जन्म”

On: January 13, 2023 12:22 PM
---Advertisement---

मुंबई | स्वामी विवेकानंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या रुपात पुनर्जन्म घेतला आहे, असं पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पार्टीचे खासदार सौमित्र खान यांनी म्हटलं आहे.

स्वामी विवेकानंद यांनी पंतप्रधान मोदी यांच्या रुपात पुनर्जन्म घेतला आहे. स्वामी आपल्यासाठी देवासमान आहेत, असंही ते म्हणालेत.

मोदी यांनी देशासाठी जीवन समर्पित केले आहे. ते आधुनिक भारताचे स्वामी विवेकानंद आहेत असे मला वाटतं, असं त्या म्हणाल्यात.

सौमित्र खान त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून तृणमूल काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केला आहे.

खान यांचे विधान म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा अवमान आहे. स्वामी विवेकानंद यांची विचारधारा ही भाजपाच्या विचारसरणीच्या अगदी विरोधात आहे, असं हकीम म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now