सर्वात मोठी बातमी! काँग्रेस हायकमांडचा सत्यजित तांबेंना झटका

On: January 16, 2023 5:01 PM
---Advertisement---

नाशिक | नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून (MlC Election) सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना काँग्रेसकडून उमदेवारी देण्यात आली होती, पण त्यांनी उमेदवारी जाहीर होऊनही अर्ज दाखल केला नाही.

दुसरीकडे त्यांचे पुत्र सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला आहे. यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ माजलीये.

वडील सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना एबी फॉर्म देऊन सुद्धा त्यांनी अर्ज भरला नाही. तर त्यांचा मुलगा सत्यजीत यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. त्यामुळे सत्यजीत तांबे यांच्यावर कारवाईची सूचना करण्यात आली आहे.

दोनच दिवसात सुधीर तांबे यांचे निलंबन करण्यात आले. आता सत्यजीत तांबे यांच्यावर देखील कारवाईची टांगती तलवार आहे.

सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यांनतर आपल्याला सर्वच पक्षाचा पाठिंबा आवश्यक असणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करणार असून भाजपचा देखील पाठिंबा घ्यावा लागणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यामुळे सत्यजीत तांबे हे कुठेतरी भाजपच्या वाटेवर आहेत अशाप्रकारचा सूर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात दिसून येत होता. 

दरम्यान, आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजप आणि शिवसेनेकडून जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे. अशातच अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या नॉट रिचेबल झाल्या आहेत. त्यांच्याशी कुणाचाही संपर्क होत नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now