Satara Lok Sabha | गेल्या काही दिवसांपासून महायुतीत सातारा लोकसभा (Satara Lok Sabha) मतदारसंघात कोणता उमेदवार जाहीर करायचा याबाबत विचार सुरू होता. नुकताच महाविकास आघाडीने शरद पवार यांच्या गटातील शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीचा अर्ज भरला. त्यानंतर त्यांनी साताऱ्यामध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. अशातच महायुतीकडून इच्छूक असलेले भाजप नेते उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. (Satara Lok Sabha)
उदयनराजे विरूद्ध शशिकांत शिंदे
भाजपच्या वरिष्ठांनी प्रेसनोट जाहीर करत उदयनराजे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर केली आहे. आता त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. उमेदवार जाहीर होण्याआधी उदयनराजे यांनी शक्तीप्रदर्शन केलं होतं. त्यांनी प्राचारास सुरूवात केली.
काही दिवसांपासून उदयनराजे भोसले यांनी दिल्ली दौरे केले. त्यावेळी त्यांनी भाजपच्या वरिष्ठांची भेट घेतली. यावेळी त्यांनी एक-दोन नाहीतर तब्बल पाच ते सहा दौरे केलेत. त्यानंतर आज उदयनराजे यांच्या सातारा लोकसभा (Satara Lok Sabha) निवडणुकीच्या दौऱ्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय.
भारतीय जनता पार्टी की केन्द्रीय चुनाव समिति ने आगामी लोकसभा चुनाव-2024 के लिए 12वीं सूची में निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की। pic.twitter.com/VdGHChERQa
— BJP (@BJP4India) April 16, 2024
2019 रोजी सातारा लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील हे उमेदवार होते. श्रीनिवास पाटील हे शरद पवार यांचे सहकारी आहेत. त्यावेळी श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत शरद पवार यांनी पावसात भिजत भाषण केलं. त्याचा फायदा मतांवर झाला.
मात्र सध्याच्या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यासाठी नकार दिला. यामुळे शरद पवार यांनी प्लान B तयार करत शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली. आता सातारा लोकसभेतील मतदार बंधू कोणाला कौल देणार हे पाहणं गरजेचं आहे. उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
उदयनराजे यांची प्रतिक्रिया
“मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकार आहे. वेगवेगळ्या पक्षांची सरकारं येऊन गेलीत. शिवाजी महाराज यांचे जे विचार आहेत. ते मोदींच्या राजवटीत राबवले जात आहे. विकासकामं सुरू आहेत”, असं उदयनराजे यांनी सांगितलं.
News Title – Satara Lok Sabha In Udayan Raje Bhosale Official Candidate Of BJP
महत्त्वाच्या बातम्या
नाशिककरांनो काळजी घ्या!; जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा धोका वाढला
काळजी घ्या! ‘या’ शहरात उष्णतेची लाट येणार, हवामान विभागाचा इशारा
सूनेत्रा पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले…
मतदान कार्ड हरवलयं तर नो टेन्शन! इतर कागदपत्रांच्या मदतीने करता येणार मतदान
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकावर दगडफेक!






