सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी सर्वात मोठी माहिती समोर!

On: December 14, 2024 1:43 PM
Beed
---Advertisement---

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case l राज्यात गुन्हेगारांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. अशातच अवघ्या काही दिवसांपूर्वी केज तालुक्यातील मस्साजोग येथे सरपंचाचे अपहरण करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. मात्र आता घटनेसंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

सरपंच हत्या प्रकरणी महत्वाची माहिती समोर :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात आरोप असलेले केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र आता पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचा अतिरिक्त पदभार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांच्यासह सात जणांचा हात असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. मात्र या घटनेतील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून चार आरोपी अद्यापही फरार आहेत.

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case l पोलिसांच्या भूमिकेवर संशय :

याशिवाय सरपंच हत्या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर देखील संशय व्यक्त करण्यात आल्याने पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना थेट निलंबित करण्यात आलं आहे. मात्र आता त्या पाठोपाठ पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना देखील सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.

News Title –Sarpanch Santosh Deshmukh Murder Case Updates

महत्त्वाच्या बातम्या-

अटकेनंतर अल्लू अर्जुनने दिली प्रतिक्रिया, म्हणाला..

एकनाथ शिंदेंच्या दोन बड्या नेत्यांना झटका! मंत्रिपदातून पत्ता कट होणार?

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची नावे समोर, पाहा संपूर्ण यादी

कागदाच्या कपात चहा पिताय? तर वेळीच सावध व्हा; होऊ शकतो ‘हा’ आजार

सावधान! पावसासंदर्भात हवामान विभागाकडून मोठी अपडेट

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now