Sara Ali Khan पुन्हा पडली प्रेमात?, सर्वांसमोर केलं असं काही की….

On: January 30, 2024 12:36 PM
Sara Ali Khan
---Advertisement---

Sara Ali Khan | क्रिकेटपटू शुभमन गील आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) यांच्या नात्याच्या चर्चा बऱ्याच दिवस रंगत होत्या. मात्र, नंतर त्यांनी याबाबत मोठा खुलासा करत ती ‘सारा’ मी नाही असं असं म्हटलं होतं. यानंतर शुभमन सचिन तेंडुलकरची मुलगी साराला डेट करत असल्याचं कळालं. याबाबत त्यांनी अधिकृत काही सांगितलं नसले तरी अभिनेत्री सारा अली खानबाबतचा गैरसमज मात्र दुर झाला.

आता सारा आली खान (Sara Ali Khan) पुन्हा एकदा प्रेमात पडली असल्याचं म्हटलं जात आहे. सारा आणि अभिनेता कार्तिक आर्यन एका वेळेला त्यांच्या नात्यामुळे प्रचंड चर्चेत हीते. त्यांची जोडी चाहत्यांनाही प्रचंड भावते. दोघांनी एका चित्रपटात एकत्र काम देखील केलं आहे. या चित्रपटानंतर त्यांच्यात दुरावा झाल्याचं म्हटलं गेलं. मात्र, आता ते दोघे पुन्हा एकत्र आल्याचं म्हटलं आहे. त्यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओतून दोघांनीही कपल वाईबस दिल्या. त्यामुळे सोशल मीडियावर आता दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन गुजरात येथे झालेल्या फिल्मफेयर अवॉर्ड 2024 मध्ये सहभागी झाले होते. दोन दिवस हा सोहळा चालला होता. या सोहळ्यात सारा आणि कार्तिक पासून अनेक कलाकारांनी धमाकेदार परफॉर्मेंस दिला होता. सोहळ्यानंतर सर्व कलाकार पुन्हा मुंबईला परतले.

करीना कपूरसमोरच साराने मारली मिठी

अशातच सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावला याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये करीना कपूर, करिश्मा कपूर, सारा अली खान (Sara Ali Khan) आणि कर्तीक आर्यन मुंबई विमानतळावर सोबत स्पॉट झाले. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

यामध्ये सारा करीना सोबत पुढे जाताना दिसली. मात्र, नंतर ती मागे वळत कार्तिक आर्यनला फ्लाइंग किस देताना दिसून आली. हे बघून कार्तिक सारा जवळ आला आणि तिला मिठी मारली. दोघांनी गळाभेट करत एकमेकांना सी ऑफ दिला. दोघांनी करीना समोरच मिठी मारली. हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

सारा आणि कार्तिकचा व्हिडीओ व्हायरल

चाहत्यांना कार्तिक आणि साराला (Sara Ali Khan) एकत्र बघून बराच आनंद झाला आहे. त्यांच्या या व्हिडिओवर प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘सारा आणि कार्तिक यांनी पुन्हा एकदा एकत्र यायला हवं, असं एका युजरने लिहिलं तर, एकाने ‘सारा-कार्तिक जानु आहेत.’ असं म्हटलं. काही दिवसांपुर्वीच सारा करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये सहभागी झाली होती. येथे तिने कार्तिकचं कौतुक केलं होतं. त्यामुळे दोघे पुन्हा एकदा एकत्र आल्याचं म्हटलं जात आहे.

News Title-  Sara Ali Khan give flying kiss to kartik aaryan

 महत्त्वाच्या बातम्या –

Filmfare Awards 2024 | अवॉर्ड जिंकल्याचा आनंद गगनात मावेना; आलिया-रणबीरचा डान्स अन् KISS

Hemant Soren | ED ची मोठी कारवाई! मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीतील घरावर छापा, BMW जप्त

IND vs ENG | क्रिकेटसाठी सरकारी नोकरीला मारली लाथ; जड्डूची जागा घेणारा सौरभ कोण आहे?

IND vs ENG | पराभवानंतर भारतीय संघात मोठा बदल; 3 नव्या चेहऱ्यांना संधी, जड्डू-राहुल बाहेर

“मी JEE नाही करू शकत, आई-बाबा मला माफ करा”, 18 वर्षीय विद्यार्थिनीनं संपवलं जीवन

Join WhatsApp Group

Join Now