वाल्मिक कराड गँगविरोधात ठोस पुरावे; उज्ज्वल निकम यांनी कोर्टात काय सांगितलं?

On: March 27, 2025 2:27 PM
Ujjwal Nikam
---Advertisement---

Santosh Deshmukh | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात बुधवारी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात झालेल्या सुनावणीत विशेष सरकारी वकील अँड. उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी ३२ मिनिटांत खंडणीपासून ते खूनापर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम कोर्टासमोर मांडला. यावेळी त्यांनी सीसीटीव्ही, सीडीआर, टॉवर लोकेशन, ऑडिओ-व्हिडिओ क्लिप्ससारखे अनेक डिजिटल पुरावे असल्याचं स्पष्ट केलं.

निकम यांचा युक्तिवाद

९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मीक कराड (Valmik Karad), विष्णू चाटे (Vishnu Chate), सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) यांच्यासह एकूण आठ आरोपी आहेत. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सुनावणीत नमूद केलं की या गुन्ह्याची पाळंमुळं खंडणीच्या धमकीपासून सुरू होतात आणि शेवटी अमानवी हत्येत रूपांतर होतात.

याचवेळी आरोपींचे वकील अँड. विकास खाडे (Vikas Khade) यांनी सर्व डिजिटल पुराव्यांची माहिती मागवण्यासाठी अर्ज दाखल केला. मागील सुनावणीत २६ मार्च रोजी हे पुरावे देण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं. मात्र, ती प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने त्यांनी पुन्हा अर्ज करत पुरावे त्वरीत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

व्हीसीद्वारे आरोपींची हजेरी

या प्रकरणात सर्व आरोपींची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (VC) हजेरी घेण्यात आली. मात्र, एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार असून, त्याचा तपास सुरू आहे. सुरुवातीला केज न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू होती, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव सीआयडीने हा खटला बीड न्यायालयात वर्ग करण्याची मागणी केली होती, ज्यावरून बुधवारपासून बीडच्या मकोका न्यायालयात सुनावणी सुरू झाली.

विशेष म्हणजे, कोर्टात दाखवले जाणारे पुरावे हे कराड गँगच्या गुन्ह्यांत प्रत्यक्ष सहभाग दर्शवणारे असून, आरोपींना अडचणीत आणणारे ठरत आहेत. पुढील सुनावणी आता १० एप्रिल रोजी होणार आहे, ज्यात अधिक पुरावे आणि युक्तिवाद सादर होण्याची शक्यता आहे.

 Title: Strong Evidence Against Karad Gang, Next Hearing on April 10

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now