Santosh Deshmukh | बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याने पोलीस तपासात गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर, पोलिसांच्या हाती महत्त्वाचे व्हिडिओ आणि फोटो स्वरूपातील पुरावे लागले आहेत. या पुराव्यांमध्ये देशमुख यांच्या शेवटच्या क्षणांची मिनिट-टू-मिनिट माहिती नोंदवलेली आहे.
१५ व्हिडिओ, ८ फोटो – मोबाईलमध्ये कैद झालेला क्रौर्याचा काळा अध्याय
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी, म्हणजेच ९ डिसेंबर २०२४ रोजी, आरोपी महेश केदार (Mahesh Kedar) याने आपल्या मोबाईलमध्ये तब्बल १५ व्हिडिओ आणि ८ फोटो घेतले होते. या व्हिडिओजवळील टाइमस्टँपवरून आणि दृश्यांवरून हत्येचा काळ आणि पद्धती अत्यंत थरारकपणे स्पष्ट होते.
पहिला व्हिडिओ ३ वाजून ४६ मिनिटांनी शूट करण्यात आला होता. यात संतोष देशमुख यांना मारहाण करण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येते. शेवटचा व्हिडिओ ५ वाजून ५३ मिनिटांचा असून त्यात देशमुख यांचा थकलेला, विव्हळता भरा आवाज ऐकू येतो. या व्हिडिओनंतर काहीच वेळात त्यांचा मृत्यू झाला, असे तपासात निष्पन्न झाले आहे.
१२७ मिनिटांचे अत्याचार, थरकाप उडवणारे दृश्य
या व्हिडिओ आणि फोटो पुराव्यांवरून हे स्पष्ट होते की देशमुख यांच्यावर सतत १२७ मिनिटं म्हणजेच दोन तास सात मिनिटं मारहाण चालू होती. मृत्यूपूर्वीच्या क्षणात देशमुख यांचा वेदनांनी विव्हळलेला चेहरा आणि अत्याचार करणाऱ्यांची निर्दयी वृत्ती या दृश्यांमधून ठळकपणे समोर आली आहे.
या सगळ्या दृश्यांनी तपास अधिक खोलवर गेला असून आरोपींच्या क्रौर्याला आता अधिकृत पुराव्यांच्या आधारे सिद्ध करण्यात पोलिसांना मदत होत आहे. या व्हिडिओ आणि फोटोमुळे न्यायालयीन प्रक्रियेत आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
Title : Santosh Deshmukh Last 127 Minutes Captured on Video






