‘लग्नाचे आमिष, गर्भपात…’, मोनालिसाच्या दिग्दर्शकावर बलात्काराचा आरोप, धक्कादायक खुलासे समोर

On: March 31, 2025 7:07 PM
director sanoj mishra
---Advertisement---

Sanoj Mishra | प्रयागराज महाकुंभमध्ये माळा विक्री करताना व्हायरल झालेल्या मोनालिसाला चित्रपटात संधी देण्याची घोषणा करणारे दिग्दर्शक सनोत मिश्रा (Sanoj Mishra) सध्या बलात्कार प्रकरणात अडचणीत सापडले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. झाशीच्या (Jhansi) एका तरुणीने चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.

टिकटॉकवरून ओळख-

तक्रारदार तरुणीच्या म्हणण्यानुसार, 2020 साली ती झाशीत राहत असताना तिची ओळख टिकटॉक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सनोज मिश्रा (Sanoj Mishra) यांच्याशी झाली. ओळख वाढल्यावर 17 जून 2021 रोजी मिश्रा यांनी तिला फोन करून झाशी रेल्वे स्थानकावर पोहोचल्याचे सांगितले. सामाजिक दबावाचे कारण देत तिने भेटण्यास नकार दिला असता, त्यांनी आत्महत्येची धमकी दिली.

भीतीपोटी दुसऱ्या दिवशी, 18 जून 2021 रोजी, ती त्याला भेटायला गेली. तेव्हा मिश्रा तिला एका रिसॉर्टमध्ये घेऊन गेले आणि नशेचे पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार केला. तक्रारीत असंही म्हटलं आहे की, मिश्रा यांनी तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ तयार केले आणि विरोध केल्यास ते व्हायरल करण्याची धमकी दिली.

गर्भपात आणि धमक्या-

पीडितेच्या एफआयआरनुसार, मिश्रा यांनी तिला लग्नाचे आमिष देत वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिला चित्रपटात काम देण्याचंही खोटं आश्वासन देण्यात आलं. याच अपेक्षेने पीडिता मुंबईत मिश्रासोबत राहायला गेली. तिथेही तिच्यावर अत्याचार आणि मारहाण सुरूच होती.

तिच्या म्हणण्यानुसार, सनोज मिश्रा (Sanoj Mishra) यांनी तिचा तीन वेळा जबरदस्तीने गर्भपात करवून घेतला. अखेर फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांनी तिचा संबंध तोडला आणि तक्रार केल्यास फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली.

सनोज मिश्रावर गुन्हा दाखल-

पीडितेच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी सनोज मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल केला. चौकशीनंतर पोलिसांनी त्यांना अटक केली असून, जामिनासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र कोर्टाने ती याचिका फेटाळली.

ही घटना विशेषतः चर्चेत आली कारण सनोत मिश्रा यांचे नाव महाकुंभ मेलनात व्हायरल झालेल्या मोनालिसा या मुलीसोबत जोडले गेले होते. त्यांनी तिला ‘द मणिपुर डायरी’ या चित्रपटात संधी दिल्याचे जाहीर केले होते. सद्यःस्थितीत पोलिस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

News Title : Sanoj Mishra Held in Rape Case

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now