Sanoj Mishra | महा कुंभ मेलनात ब्रेड विक्री करताना व्हायरल झालेल्या मोनालिसाला चित्रपटाची ऑफर देऊन चर्चेत आलेले दिग्दर्शक सनोत मिश्रा (Sanoj Mishra) यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप लागला आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली असून, एका तरुणीने त्यांच्यावर पिंजऱ्यात ठेवून शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.
काय आहे प्रकरण?
तक्रारदार तरुणीच्या माहितीनुसार, 2020 मध्ये झाशी (Jhansi) येथे राहत असताना तिची ओळख सनोज मिश्रा (Sanoj Mishra) यांच्याशी टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवरून झाली. ओळख वाढल्यानंतर दोघांमध्ये नियमित संपर्क सुरू झाला. 17 जून 2021 रोजी सनोत मिश्रा यांनी झाशी रेल्वे स्थानकावर असल्याचे सांगत तिला भेटायला बोलावले. तरुणीने नकार दिल्यावर, त्यांनी आत्महत्येची धमकी दिल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.
भीतीपोटी दुसऱ्या दिवशी, 18 जून 2021 रोजी, ती त्याला भेटायला गेली. मिश्रा यांनी तिला एका रिसॉर्टमध्ये नेले आणि नशा आणणारे पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार केला, असा गंभीर आरोप आहे. इतकेच नव्हे, त्यांनी तिचे अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली, असेही तिने पोलिसांना सांगितले आहे.
लग्नाचे आमिष, चित्रपट भूमिका देण्याचे खोटे आश्वासन-
तक्रारीत पुढे म्हटले आहे की, मिश्रा (Sanoj Mishra) यांनी तरुणीला लग्नाचे आमिष आणि चित्रपटात भूमिका देण्याचे खोटे वादे करत वारंवार तिचा गैरफायदा घेतला. ती एक चित्रपट अभिनेत्री बनू शकते, असे सांगून ते तिला अनेक वेळा भेटायला बोलवत आणि तिचा शारीरिक शोषण करत, असा आरोप आहे.
अलीकडेच सनोत मिश्रा यांनी महा कुंभमध्ये व्हायरल झालेल्या मोनालिसाला ‘द डायरी ऑफ मणिपूर’ या चित्रपटात संधी दिल्याची घोषणा केली होती. मोनालिसा ब्रेड विकत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर मिश्रा यांनी तिच्या अभिनय प्रशिक्षणालाही सुरुवात केली होती आणि तिला विविध कार्यक्रमांत घेऊन जाताना दिसले होते. सनोत मिश्रा यांनी याआधी ‘गांधीगिरी’, ‘राम की जन्मभूमी’, ‘लफंगे नवाब’, ‘धर्म के सौदागर’ आणि ‘काशी टू कश्मीर’ यांसारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.






