Sankashti Chaturthi | आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी यंदा शुक्रवार, 10 ऑक्टोबर 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान गणेशाच्या वक्रतुंड रूपाची पूजा केली जाते. विशेष म्हणजे, या दिवशी करवा चौथ चा योगही जुळत असल्याने धार्मिकदृष्ट्या हा दिवस अधिक मंगल मानला जात आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी काही राशींवर बाप्पाची विशेष कृपा राहणार आहे. आर्थिक, वैवाहिक आणि व्यावसायिक क्षेत्रात या राशींना नवे यश मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींचं भाग्य उजळणार आहे.
भाग्यवान ठरणाऱ्या राशी :
वृषभ (Taurus)
वृषभ राशीच्या व्यक्तींना संकष्टी चतुर्थीचा योग अत्यंत शुभ ठरणार आहे. व्यावसायिक क्षेत्रात नवे करार, भागीदारी किंवा संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचे संकेत असून आर्थिक स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक जीवनात समाधान आणि सौहार्द वाढेल.
कर्क (Cancer)
कर्क राशीच्या व्यक्तींना या काळात कार्यक्षेत्रात जलद प्रगती होईल. सरकारी नोकरी किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. व्यवसायात नव्या संधी येतील आणि पूर्वी अडलेली कामं मार्गी लागतील. नातेसंबंधांतील गैरसमज दूर होऊन प्रेम आणि विश्वास वाढेल.
Sankashti Chaturthi | सुखसमृद्धी आणणाऱ्या राशी :
धनु (Sagittarius)
धनु राशीच्या व्यक्तींना या काळात जीवनात स्थैर्य मिळेल. नवीन व्यवसाय किंवा परदेशी संधींचा लाभ होईल. वरिष्ठ पदांवर असलेल्यांना नवे प्रकल्प सांभाळण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवनात संवाद आणि समज वाढल्याने संबंध अधिक मजबूत होतील.
मिथुन (Gemini)
मिथुन राशीसाठी हा काळ अतिशय लाभदायक आहे. उत्पन्नात वाढ होईल आणि समाजात प्रतिष्ठा वाढेल. बाप्पाच्या कृपेने अडथळे दूर होऊन आनंद आणि समृद्धी प्राप्त होईल.
कन्या (Virgo)
कन्या राशीच्या लोकांना या दिवशी आर्थिक लाभाचे संकेत आहेत. आत्मविश्वास वाढेल आणि अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयक्षमतेचा सगळ्यांना लाभ होईल. नशीब तुमच्या बाजूने असेल.
चंद्रोदयाची वेळ आणि शुभ मुहूर्त :
धार्मिक मान्यतेनुसार, संकष्टी चतुर्थीचे व्रत चंद्रदर्शनानंतर पूर्ण होते. त्यामुळे चंद्रोदयाची वेळ अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
चतुर्थी तिथी सुरू : 9 ऑक्टोबर 2025, रात्री 10:54
चतुर्थी तिथी समाप्त : 10 ऑक्टोबर 2025, रात्री 7:38
चंद्रोदयाची वेळ : 10 ऑक्टोबर 2025, रात्री 8:13
या शुभ मुहूर्तात बाप्पाची भक्तिभावाने पूजा केल्यास सर्व संकटे दूर होतात आणि जीवनात शुभ फलप्राप्ती होते.






